कोकण

कळणेतील खाणकाम थांबवा; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सकाळ डिजिटल टीम

ओरोस : कळणे (kalane mining) (ता. दोडामार्ग) येथील ३२.२५ हेक्टर आर क्षेत्रावरील खाणपट्ट्यात २९ जुलैला झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियन २००५ (collector order) नुसार जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज खाणपट्ट्यातील खाणकाम व खनिजाची वाहतूक पुढील सूचना प्राप्त होईपर्यंत तत्काळ बंद करण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले. (sindhudurg district)

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ३० मधील पोट कलम ३ व ५ अन्वये हे आदेश देतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी खाण सुरक्षा निर्देशालय, प्रादेशिक कार्यालय, गोवा यांच्या निर्देशानुसार आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याचीही सूचना याद्वारे केली. संबंधित कंपनीसाठी त्यांचे संचालक व व्यवस्थापक यांना पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे, की २९ जुलैला सकाळी आठच्या दरम्यान कळणे येथील प्रमुख खनिज खाण पट्ट्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन २० ते २५ कुटुंबांच्या घरात पाणी गेले. शेतीचे व बागायतीचे नुकसान झाले.

मंजूर खाणपट्ट्याच्या उत्तरेकडील बाजूस असलेल्या डोंगराचा काही भाग व बाक पाणी भरलेल्या खड्ड्यात पडले. त्यामुळे खड्ड्यातील पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर फेकले गेले. या खड्ड्याला असलेला बांध फुटून पाणी दुसऱ्या खड्ड्यात आले. पाण्याच्या अतिरिक्त दबावामुळे खाणीच्या दक्षिणेकडील बांध फुटला व त्यातील मातीमिश्रीत पाणी मोठ्या प्रमाणात गावाच्या दिशेने प्रवाहित झाले. हे पाणी गावातील स्थानिकांच्या घरात, शेतात व बागायतींमध्ये शिरले. पाण्याचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणात असल्याने यात घरांचे, शेतीचे, बागायतींचे व प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे.

पंचनामे सुरूच

सावंतवाडी उपविभागीय अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्राथमिक पाहणी अहवालानुसार एकूण १४ घरे, गोठे यांचे एकूण १४ लाख रुपये आणि भातशेती, नागली बागायतीच्या अंदाजे ३० हेक्टर क्षेत्राचे सर्वेक्षण व पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : काँग्रेसच्या काळात मराठवाड्याचा विकास रखडला होता - पीएम मोदी

SCROLL FOR NEXT