Konkan 
कोकण

Konkan : दैव बलवत्तर म्हणून तीघे बचावले, कणकवलीतील बावशी गावठण येथे कोसळले घर

बावशी गावठण येथील सत्यवान पांडुरंग मर्ये यांचे राहते घर कोसळून नुकसान झाले आहे.

तुषार सावंत

बावशी गावठण येथील सत्यवान पांडुरंग मर्ये यांचे राहते घर कोसळून नुकसान झाले आहे.

कणकवली - कणकवली तालुक्यातील बावशी गावठण येथे आज पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सत्यवान पांडुरंग मर्ये यांचे राहते घर कोसळले आहे. या घटनेत सुमारे दोन लाख १० हजारांचे नुकसान झाले असून घरात एकूण तीनजण राहत होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घरातील वृध्द महिला आणि मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सदर घटना आज सकाळी साडेआठच्या सुमारास घडली आहे.

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या ईशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपासून पाऊसाने जोरदार सुरवात केली आहे. पाऊसामुळे कणकवली तालुक्यातील बावशी गावठण येथील सत्यवान पांडुरंग मर्ये यांचे राहते घर कोसळून नुकसान झाले आहे. घर कोसळ्याने नुकसान झाले आहे. मात्र कोणतीही जीवीतहानी झालेली नाही.

याबाबत माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिस पाटील समीर मयेकर, शिवराम गुरव, नारायण मर्ये, पारकर, नार्वेकर यानी धाव घेत मदतकार्य केले. जवळच असणाऱ्या एका घरात नुकसानग्रस्त कुटुंबाला स्थलांतरित करण्यात आले. यावेळी सरपंच मनाली गुरव, उपसरपंच अशोक बोभाटे, ग्रा. पं. सदस्य दिनेश कांडर, रविंद्र बोभाटे, सानिका गावडे यानी भेट घेत माहिती घेतली. तलाठी सुदर्शन अलकुटे यांनी पाहणी आणि पंचनामा करून सुमारे दोन लाख दहा रूपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल वरीष्ठ पातळीवर पाठवला आहे. त्यामुळे या कुटुंबाला तातडीने मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT