कोकण

केसरकर यांचा जिल्ह्यात वचक : सावंत

सकाळवृत्तसेवा

सावंतवाडी : माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्या काळात गेल्या काही वर्षात जिल्ह्यात सुरू असलेले राजकीय हत्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या काळात थांबल्या हाच त्याचा मतदार संघावरील वचक आहे. त्यामुळे  जिल्ह्यात वचक नाही, असे म्हणणार्‍यांनी स्वाभिमानच्या पदाधिकार्‍यांनी या गोष्टीचा नक्कीच अभ्यास करावा, असा टोला शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.

दुसर्‍यांच्या पदाधिकार्‍यांवर टीका करणार्‍या स्वाभिमानच्या पदाधिकार्‍यांनी आपल्या विद्यमान नगरसेवकांनी मागच्या काळात कोण कोणते कारनामे केले आहेत, कोणाची घरे उद्धवस्त केली आहेत. याचे उत्तर द्यावे असेही सावंत यांनी सांगितले 

सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेविका आनारोजीन लोबो,भारती मोरे,अनिता कविटकर,कमला मेनन,रश्मी माळवदे आदी उपस्थित होते 

सावंत म्हणाल्या, या ठिकाणी काल पत्रकार परिषद घेऊन सावंत यांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर अत्यंत खालच्या थरावर जावून आरोप केले. या ठिकाणी त्यांचे श्राध्द घालण्याची भाषा केली गेली. मात्र, वेळ आल्यास आम्ही शिवसेनेच्या महिला पदाधिकारी पाताडे यांचे नक्कीच श्राध्द घालू, असा इशारा त्यांनी दिला.

त्या पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात केसरकरांचा वचक नाही असा आरोप केला. मात्र, गेल्या चार वर्षांत या ठिकाणी एकही राजकीय हत्या झाली नाही. मात्र, मागच्या पालकमंत्र्यांच्या काळात नेमके काय झाले, याचा अभ्यास पाताडे यांनी करावा आणि त्यानंतर विधान करावे, केवळ आपल्याला सवंग प्रसिध्दी मिळावी म्हणून टीका करणे योग्य नाही.

केसरकर हे सावंतवाडीचे पालकमंत्री नाहीत तर ते राज्याचे मंत्री आहेत हे त्यांनी विसरू नये. त्यांचे नाव न घेतल्याशिवाय पाताडे यांना बरे वाटत नसेल तर त्यांनी झोपेच्या गोळ्या घ्याव्यात. त्या पुढे म्हणाल्या, केवळ राजकारण करण्यासाठी पाताडे यांनी आरोप केले. मात्र, आम्ही शिवसेनेच्या पदाधिकारी संबधित मुलीच्या घरी जावून तिला धीर दिला ही वस्तूस्थिती आहे 

'त्या' लॉजशी शिवसेनेचा संबंध नाही

दरम्यान, मळगाव येथे असलेले हॉटेल शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकार्‍याचे नाही. केवळ राजकीय फायदा घेण्यासाठी प्रणिता पाताडे यांच्याकडून आरोप केले जात आहे. याप्रकरणी संबधित लॉजवर कारवाई व्हावी, अशी शिवसेनेचीही मागणी आहे, असे त्यांनी सांगितले. तो अनेक वर्षांपूर्वी आमच्या एका लोकप्रतिनिधीचा होता, मात्र तो आता विकला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार

SCROLL FOR NEXT