KKVs for farmers A unique calendar kokan marathi news
KKVs for farmers A unique calendar kokan marathi news 
कोकण

शेतकऱ्यांनो खुशखबर तुमच्यासाठी आलंय नविन कॅलेंडर..

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : दिनदर्शिकेच्या माध्यमातून कोकणातील विविध पिकांची आणि शेती हंगामाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा फंडा दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने यंदा अमलात आणला आहे. पहिल्या पानावर तारखा आणि त्या-त्या महिन्यात येणाऱ्या कृषी विषयक माहितीचे मुद्दे. पुढील पानावर त्याची सविस्तर माहिती दिली गेली आहे. दिनदर्शिका ही मार्गर्शक ठरली आहे. 

शेतकरी प्रशिक्षित झाला तर निसर्गाच्या फेऱ्याचा थोडाफार सामना करू शकेल. यासाठी कोकण कृषी विद्यापीठाकडून प्रशिक्षण, मार्गदर्शन करण्यात येते. कोकणातील सर्वच शेतकऱ्यांना एकाच हंगामात प्रशिक्षण देणे शक्‍य नाही. पण येथील शेतकऱ्यांची क्षमता वाढावी, यासाठी त्यांना वेळीच हंगामी मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे. यातूनच विद्यापीठाने शेतकऱ्यांना उपयुक्‍त ठरू शकेल, असे कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे.

 काय असणार या कॅलेंडरमध्ये.. 

 2014 पासून हे कॅलेंडर प्रसिद्ध केले जाते. या कॅलेंडरचा प्रारंभ 1 जानेवारीपासून न होता 1 एप्रिलपासून सुरु होतो. खरीप ते रब्बी अशा हंगामासाठी हे कॅलेंडर तयार केले आहे. त्यातून शेतकऱ्यांना उपयुक्‍त सल्ले दिले आहेत. तारखेच्या पानावर त्या महिन्यातील शेती उत्पादनाची संक्षिप्त माहिती दिली जाते. त्या पाठीमागील पानावर त्याची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भातशेतीची मशागत, पेरणी, लावणी, काढणी, भातशेतीची तांत्रिक पद्धत, बियाणे आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. हे कॅलेंडर कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांच्या संकल्पनेतून तयार झाले आहे.

शेतकऱ्यांना  मिळणार शेतीविषयक पुरक माहिती

कोकणात भात, आंबा, काजू आणि नारळ यांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. बदलत्या हवामानाचा परिणाम, अनियमित व अति पर्जन्यमान, खतांचा तुटवडा, मजुरांची कमतरता, वेगवेगळ्या रोगांचा प्रादूर्भाव त्यामुळे भाताचे उत्पन्न कमी झाले आहे. पावसाच्या लहरीपणाचा व वाढत्या महागाईसह मजूर टंचाईचा फटका येथील शेतकऱ्याला बसत असून, शेतकरी तोट्यातील भातशेती करत आहेत. शेतकऱ्यांना शेतीविषयक पुरक माहिती दिली गेली तर त्याचा फायदा निश्‍चितच होऊ शकतो. त्यासाठी कॅलेंडरचा प्रयोग करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT