Kokan Dam Planning In Guhagar Kokan Marathi News 
कोकण

गुहागरमध्ये साधकांनी केले 'अश्यापद्धतीने' पाण्याचे नियोजन...

मयुरेश पाटणकर

गुहागर (रत्नागिरी) : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या 2 हजार 519 साधकांनी गुहागर, चिपळूण आणि खेड तालुक्‍यातील 21 गावांमध्ये श्रमदानाने बंधारे बांधत आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. या बंधाऱ्यामुळे 5 कोटी 40 लाख 5 हजार 496 लिटरचा जलसंचय झाला आहे. या जलसाधनेचे तीनही तालुक्‍यातून कौतुक होत आहे. 

रेवदंडामधील (जि. रायगड) डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 मध्ये श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समितीची स्थापना केली. निर्व्यसनी, समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी प्रवचन, निरूपणातून समर्थ रामदास स्वामींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था उभी केली. या व्यवस्थेलाच श्री बैठक म्हणून ओळखले जाते. संसारी महिला-पुरुषांबरोबरच लहान मुलांसाठी बालोपासनेची व्यवस्थाही आहे. 

साधना करणारा मोठा परिवार

कोकणात नव्हे तर संपूर्ण देशात व जगातील काही देशात नेमाने ही बैठक सुरू आहे. आठवड्यातून एकदा या बैठकीला जाऊन साधना करणारा मोठा परिवार आहे. साधकाला पारमार्थिक ज्ञान देण्याबरोबर सामाजिक दायित्वाची दृष्टीही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिली. आज डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरण, आरोग्य आदी क्षेत्रातही काम सुरू आहे. पावसाळ्यात हजारोंच्या संख्येने वृक्षलागवड करायची. पावसाळ्यानंतर साधकांचे गट तयार करून झाडे जगण्यासाठी पाणी घालण्याची व्यवस्था उभी करायची. अशी मोठी चळवळ बैठक परिवाराने उभी केलेली सर्वश्रुत आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी किंवा ग्रामीण भागातील गावात 200 ते 300 साधक स्वच्छता मोहीम राबवतात. हे साधक जलसाधनेकडे वळले आहेत.

सोबतीला असोत किंवा नसोत कामाला सुरवात 

यावर्षी कोकणातील प्रत्येक तालुक्‍यातील काही गावे निवडून तेथील नदीवर बंधारे बांधण्याचे काम साधकांनी केले. निवडलेल्या गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या मदतीने बंधारा बांधण्याचे ठिकाण निश्‍चित केले जाते. ठरलेल्या दिवशी बंधारा बांधण्यासाठी आवश्‍यक साहित्य घेऊन परिसरातील साधक येतात. गावकरी सोबतीला असोत किंवा नसोत कामाला सुरवात करतात. बंधारा घातला जातो. सोबत आणलेली न्याहारी करून साधक परत आपल्या घरी जातात. उद्‌घाटन, पुष्पगुच्छ, आभार, फोटोसेशन यातील कोणताही सोपस्कार साधक कटाक्षाने टाळतात. या पद्धतीने साधकांनी तीन तालुक्‍यात 21 बंधारे बांधले. 

तालुका साधकांची संख्या बंधाऱ्यांची संख्या पाणी साठा (लिटर) 
* गुहागर 4956 965190.78 
* खेड 1095 7 1267160.73 
* चिपळूण 929 8 3173144.46 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT