Kokan Devlopment In Ratnagiri Kokan Marathi News 
कोकण

किनाऱ्यावरील गावामध्येही आता लवकरच होम स्टे.....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : येथील तत्कालीन युती शासनाने कोकण पर्यटन महामंडळाची स्थापना केली. पर्यटनाला चालना देण्यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावरील गावे दत्तक घेऊन त्यातील 500 घरांमध्ये न्याहारी निवास योजना आखली. त्यासाठी तिनही जिल्हा बॅंकाच्या अध्यक्षांशी चर्चा करून 100 कोटी रुपये देण्याचे ठरले. या योजनेतून पर्यटक नक्की कोकणात राहतील, जास्तीत जास्त पर्यटन उद्योजकांनी यात भाग घ्यावा, असे आवाहन आमदार तथा भाजप उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केले. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेतर्फे दुसऱ्या शाश्‍वत पर्यटन परिषदेच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते.

दबावगट गरजेचा

अल्पबचत सभागृहात ही परिषद दिवसभर आयोजित केली. या वेळी खासदार मनोज कोटक म्हणाले, एखादी चांगली गोष्ट सरकारकडून करून घ्यायची असेल तर दबावगट हवा. असा गट रत्नागिरीत कार्यरत असल्याबद्दल आनंद वाटतो. कोकणात करण्यासारखे खूप आहे. कोकणी माणूस उद्योजक होऊ शकतो. इको टुरिझम, स्थानिकांचा सहभाग घेऊन पर्यटन विकास, त्यातून रोजगाराच्यादृष्टीने पावले उचलावीत. देशांतर्गत पर्यटनालाही भरपूर वाव आहे. उत्तरेतील अनेक पर्यटक गोव्यात हमखास जातातच. त्यांना कोकणात वास्तव्यासाठी आकृष्ट केले पाहिजे.

 उपस्थिती
या वेळी "हिरवळ' संस्थेचे किशोर धारिया, मिनल ओक, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, उल्का विश्‍वासराव, जि. प. सदस्य उदय बने, हॉटेल्स असोसिएशनचे रमेश कीर, ऍड. विलास पाटणे, माजी आमदार बाळ माने, माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, प्रशांत शिरगावकर, भाजप तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ढेकणे, पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर, सुधीर रिसबूड आदी उपस्थित होते. 

'आपलं गाव' मुंबईतील घराघरांत 
समुद्रकिनारे साफ करणे, हे थोडे कठीण काम आहे. याकरिता जर्मनमधून आयात केलेले एक मशीन मी आमदार निधी व सीएसआरमधून रत्नागिरीसाठी दिले आहे. आणखी तीन मशीन देण्याचा मानस आमदार लाड यांनी व्यक्त केला. निसर्गयात्री संस्थेच्या 'आपलं गाव' ऍपची माहिती मुंबईतील प्रत्येकाच्या घरांत कशी पोहोचेल, यासाठी प्रयत्न करू आणि लवकरच याबाबत बैठक बोलावू, अशी ग्वाही दिली. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT