Kokan MLC Election Result Sakal
कोकण

Kokan MLC Election Result : मविआला कोकणात पहिला धक्का; विधान परिषदेत भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

कोकण मतदारसंघातील शिक्षकांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kokan MLC Election Result : राज्यात सध्या सर्वांचं लक्ष शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीकडे लागलेले असताना आता या निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. (BJP Candidate Dnyaneshwar Mhatre Win In Kokan MLC Election)

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, या निकालात मविआला धक्का बसला आहे. कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले असून, त्यांनी शेकापचे बाळाराम पाटील यांना पराभूत केलं आहे.

विजयानंतर म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कोकण मतदारसंघातील शिक्षकांच्या एकजुटीमुळे हा विजय झाला आहे. त्यामुळे या सर्वांचे आभार म्हात्रे यांनी यावेळी मानले. या मतदारसंघात आजपर्यंत फक्त शिक्षक आमदार झाले आहेत. तीच परंपरा शिक्षकांनी राखल्याचा दावा म्हात्रे यांच्या बंधूंनी विजयानंतर केला आहे.

तर, पराभूत बाळाराम पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कोकणच्या शिक्षकांचा कौल खुल्या दिलानं मान्य असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच आलेला निकाल मान्य करून पुढे मार्गक्रमण करण्याचा विचार आहे. यावेळी त्यांनी निवडणुकीसाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे आभार व्यक्त केले.

मतदानाची अंतिम आकडेवारी

ज्ञानेश्वर म्हात्रे - 20683( विजयी उमेदवार भाजप), बाळाराम पाटील -10997( महाविकास आघाडी), धनाजी पाटील -1490, उस्मान रोहेकर -75, तुषार भालेराव - 90, रमेश देवरुखकर- 36, राजेश सोनावणे - 63, संतोष डामसे -16, नोटा आणि बाद - 1619, एकूण मतदान - 35069, मोजली गेलेली मते - 33450

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : पहिल्या घासाला खडा

Horoscope Prediction : आज धनयोग + सर्वार्थ सिद्धी योग! 'या' 5 राशींना होणार धनलाभ अन् भगवान विष्णू अनेक अडचणी दूर करणार!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 नोव्हेंबर 2025

ढिंग टांग : बिबटे : ठिपके आणि ठपके..!

Horoscope : शुक्र ग्रहात विशेष गोचर! बनतोय लक्ष्मी नारायण योग; 'या' राशीच्या लोकांच्या अपूर्ण इच्छा होणार पूर्ण, पैशाची अडचण संपणार

SCROLL FOR NEXT