Kokan Railway Breaking sakal
कोकण

Kokan Railway Breaking: चिपळूण -करंजाडी दरम्यान कोकण रेल्वेचा मेगा ब्लॉक!

कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण ते करंजाडी दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे |A mega block of railway will be taken up between Chiplun and Karanjadi on the Konkan railway line

सकाळ वृत्तसेवा


Kankavli Railway Station: कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण ते करंजाडी दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मंगळवारी (ता.२३) दुपारी एक ते सायंकाळी ३.४० दरम्यान हा अडीच तासांचा मेगा ब्लॉक असेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली.

प्रशानाने दिलेल्या माहितीनुसार, करंजाडी - चिपळूण विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी हा मेगा ब्लॉक चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मार्गावरील काही रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे. गाडी क्र.०२१९७ कोईम्बतूर ते जबलपूर या गाडीचा प्रवास २२ एप्रिल रोजी रत्नागिरी - कामठे स्थानकांदरम्यान ७० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

गाडी क्र. १०१०६ सावंतवाडी रोड ते दिवा एक्स्प्रेसचा २३ एप्रिलला सुरू होणारा प्रवास सावंतवाडी रोड ते रत्नागिरी स्टेशन दरम्यान एक तास चाळीस मिनिटांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. १६३४५ लोकमान्य टिळक (टी) ते तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्स्प्रेसचा प्रवास २३ एप्रिलला कोलाड ते वीर स्टेशन दरम्यान ५० मिनिटांसाठी नियमित केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT