bhaskar jadhav  esakal
कोकण

Kokan : शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार भास्कर जाधव यांची भेट

रत्नागिरीतील शिवसेनेची पकड मजबूत व घट्ट

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शिवसेनेच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांची नियुक्ती केल्याबद्दल रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. चिपळूण येथील संपर्क कार्यालयात ही भेट झाली. भेटीदरम्यान रत्नागिरीतील शिवसेनेची पकड मजबूत व घट्ट आहे.

शिवसेनेच्या संघटनेत निष्ठावंतामध्ये बदल, परिणाम झालेला नाही आणि भविष्यात होणार नाही. कारण, आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना नेते आदित्य ठाकरे यांचे समर्थक आहोत, याचा आम्हा रत्नागिरीकरांना सार्थ अभिमान आहे, असे सर्वांनीच सांगितले.

याबद्दल भास्कर जाधव यांनी रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार मानून संघटनात्मक चर्चा करत असताना शिवसेनेतील जुने मित्र, त्यावेळची आमची कार्यपद्धत कशी होती, अशा अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. संघटनेबाबत योग्य आणि अचूक अभ्यासू अनुभवाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.

चिपळूण येथे सदिच्छा भेटीदरम्यान जि. प. माजी अध्यक्ष जयसिंग तथा आबा घोसाळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे, कर्लाचे माजी सरपंच दीपक सुर्वे, काशीविश्वेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण वायंगणकर, माजी उपसभापती दत्तात्रय मयेकर, विभागप्रमुख विजय देसाई, महेंद्र झापडेकर, प्रमोद लकेश्री, मयूर पाटील, शाखाप्रमुख मुन्ना घोसाळे, दिलीप शिवलकर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश नागवेकर, रमेश नागवेकर, मिलिंद सुर्वे, प्रदीप वायंगणकर, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी दुर्घटना टळली! पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

पुण्यात भाजपचा महापौर ठरला! अजितदादांनी दिलेला शब्द NCPने पाळला, फडणवीसांसोबत झाली होती चर्चा

Nagpur News: टीईटीने केली तीन हजारांवर शिक्षकांची कोंडी! अनुकंपाधारकांना पाच वर्षांची अट; अन्यथा सेवा प्रथम नियुक्तीपासून धरणार!

Pune Crime : दुर्दैवी अंत! ४ महिन्यांच्या मुलीसह मायलेकांनी विहिरीत उडी घेऊन संपवलं जीवन; पाबळमधील हृदयद्रावक घटना

Latest Marathi News Live Update : पुणे महापालिकेच्या महापौरपदासाठी मंजूषा नागपुरे यांचे नाव निश्चित

SCROLL FOR NEXT