कोकण

Kolhapur Rain Update: कोल्हापूर शहरात पाणी पुरवठा बंद

वेदशाळेकडून पुढील एक आठवडा पाऊस पडणेचा अंदाज वर्तविला आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : गेल्या तीन दिवसापासून अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी (Shinganapur, Balinga, Nagdevwadi) जल उपसा केंद्रामध्ये पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे ही पाणी उपसा प्रक्रिया केंद्रे बंद झालेली आहेत. त्यामुळे शहरातील जवळ जवळ ८० टक्के भागातील पाणी पुरवठा शुक्रवारपासून (ता. २३) बंद झाला आहे.

खर्चाच्या पाण्यासाठी इतर स्त्रोतातुन नियोजन करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

शहरातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय करणेच्या दृष्टीने महापालिकेच्यावतीने टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आले. (kolhapur-city-Water-supply-stop-kolhapur-rain-update-2021-live-news-akb84)

शहरातील ब-याचशा भागात पुराचे पाणी पसरत असलेने प्रत्येक भागाला पाणी वाटपाच्या टँकरसाठी शहरातील पाणी न आलेल्या रस्त्यावरून पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे टँकरमधून पाणी वाटपास एखाद्या भागात उशीर होऊ शकतो. तसेच सद्या कोरोनाचा प्रादुर्भाव असलेने टँकरव्दारे उपलब्ध होणारे पाणी नागरीकांनी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करून, तोंडाला मास्क लावून आवश्यक ती खबरदारी घेऊन भरून घ्यावे. वेदशाळेकडून पुढील एक आठवडा पाऊस पडणेचा अंदाज वर्तविला असलेने पुर परिस्थिती पुर्ववत होईपर्यंत नागरीकांनी टँकरव्दारे उपलब्ध होणारे पाणी पिण्यासाठी वापरावे. खर्चाच्या पाण्यासाठी इतर स्त्रोतातुन नियोजन करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT