Election
Election  Esakal
कोकण

नगरपंचायतीची निवडणूक जाहीर; भाजप, राष्ट्रवादी एकत्र येणार..?

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली (Dapoli)नगरपंचायतीची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून या निवडणुकीची आचारसंहिता कालपासून (ता. २४ ) चालू झाली आहे. एवढ्या लवकर निवडणूक जाहीर होईल, अशी कल्पना राजकीय पक्ष व प्रशासनालाही नसल्याने आता सर्वांची धांदल उडाली आहे.

दापोली नगरपंचायतीच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप (Shivsena, BJC)यांनी ही निवडणूक स्वबळावर तर राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांनी आघाडी करून ही निवडणूक लढवली होती. त्यात ७ जागांवर शिवसेना, ४ राष्ट्रवादी, ४ कॉंग्रेस व २ भाजपा असे उमेदवार विजयी झाले होते. तेव्हा शिवसेना व भाजप यांची युती असल्याने शिवसेनेचे ७ व भाजपचे २ सदस्य मिळून नगरपंचायतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडून भाजपकडे विचारणा करण्यात आली होती; मात्र भाजपने त्याला नकार दिला होता तर राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजप यांनी एकत्र येऊन भाजपचा नगराध्यक्ष तर कॉंग्रेसला उपनगराध्यक्ष पद देऊन सेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी तत्कालीन आमदार संजय कदम यांनी घोषणा केली होती; मात्र कॉंग्रेसला यात विश्वासात न घेता घोषणा केल्याने कॉंग्रेसने त्याला नकार दिला होता.

कॉंग्रेसने राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडून शिवसेनेसोबत केलेल्या प्रासंगिक करारामुळे राष्ट्रवादीने निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी केली नाही.

कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी चर्चा करून शिवसेना व कॉंग्रेस यांच्यात प्रासंगिक करार करून शिवसेनेला नगराध्यक्षपद तर कॉंग्रेसला उपनगराध्यक्षपद व विषय समित्या अशी तडजोड करून दापोली नगरपंचायतीत सत्ता स्थापन केली व ५ वर्षे ही सत्ता कायम राहिली.

कॉंग्रेसने राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडून शिवसेनेसोबत केलेल्या प्रासंगिक करारामुळे राष्ट्रवादीने त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी केली नाही. त्यामुळे झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

भाजप, राष्ट्रवादी एकत्र येणार..?

आत्ता होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीतही राज्यात महाविकास आघाडी असली तरी दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी त्यात सामील होणार नाही व शिवसेना व कॉंग्रेस ही निवडणूक एकत्र लढवण्याची चिन्हे असून भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज स्वीकारणे ः १ ते ७ डिसेंबर २०२१

उमेदवारी अर्जांची छाननी ः ८ डिसेंबर

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारिख ः १३ डिसेंबर

मतदान ः २१ डिसेंबर

मतमोजणी ः २२ डिसेंबर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT