कोकण

उद्धर येथे सापडले दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक "ऍटलास मॉथ"

अमित गवळे

पाली - जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले "ऍटलास मॉथ" सुधागड तालुक्यातील उद्धर येथे सापडले. येथे राहणारे तुषार केळकर यांच्या घरासमोरील झाडावर हे पतंग (फुलपाखरु) काही काळ विसावले होते.

जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये "ऍटलास मॉथ" ची गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. पंखावर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच  त्याला  "ऍटलास पतंग" म्हणतात. याच्या पंखांची लांबी साधारणपणे 11 ते 12 इंच किंवा 25 सेमी इतकी असते. याचे खास वैशिष्ट म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट (आळी) असतांनाच भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसांचे असल्याने तोंड आणि पचन संस्थेची गरज भासत नाही. या अल्प कालावधीतच प्रणय करून आपला वारसा (अंडी घालून) मागे ठेवून हे पतंग मरतात. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेले हा जिव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो. महाराष्ट्रात भीमाशंकर आणि बोरिवली नॅशनल पार्क तसेच इतर काही जंगलांमध्ये "ऍटलास मॉथ" सापडतो. सुधागड तालुक्यात उद्धर सारख्या गावात हा वैशिष्ठपूर्ण पतंग आढळल्याने समाधान होत असल्याचे तुषार केळकर यांनी सकाळला सांगितले. 

"ऍटलास मॉथ" चा जीवन प्रवास
 हां पतंग दालचीनी, लींबू, जांभुळ, पेरू व लींबू वर्गीय झाडांवरच आढळतो. तिथेच त्याचे प्रणय व अंडी घालणे या क्रिया होतात. मादी एका वेळेस 100 ते 200 अंडी घालते. अंडी दहा ते चौदा दिवसांत उबवून त्यातून सुरवंट (आळी) बाहेर येते. हे सुरवंट 35 ये 40 दिवस सतत झाडांची पाने खातच राहते. त्यानंतर त्याचे कोशात रूपांतर होते. एकविस दिवसांनंतर कोशातून पतंग बाहेर येते. हे पतंग (फुलपाखरु) अवघे आठवडाभर जगते. या दरम्यान प्रणय करून अंडी घालणे हा या पतंगाचा शेवटचा जीवन प्रवास असतो.

मानवी वस्तीत आलेल्या कोणत्याही प्राणी व किटकास ईजा करू नये. त्याला त्याच्या नैसर्गिक आधिवासात मुक्त संचार करू द्यावा. आमच्या झाडावर आलेल्या या पतंगास कोणतीही ईजा न होऊ देता त्याला निसर्गात मुक्त फिरू दिले.
तुषार केळकर, उद्धर, प्राणीमित्र

हां पतंग अतिशय मोहक आहे. दुर्मिळ असलेला हा पतंग सहज दिसत नाही. पच्छिम घाटात हे पतंग दिसतात. हा पर्यावरणातील अतिशय महत्वाचा घटक आहे. नरापेक्षा मादी मोठी असते. नराला जास्त आच्छादन असलेला ऐंटेना असतो. तर मादीला पातळ आच्छादन असलेला ऐंटेना असतो. मादी फेरोमोन्स नावाचे एक द्रव्य हवेत सोडते आणि नराला प्रणय करण्यासाठी आकर्षित करते. नराला काही किलोमीटरवरून सुद्धा  फेरोमोन्सचा गंध येतो. अशाप्रकारे आपल्या उण्यापुऱ्या 5 ते 7 दिवसांच्या आयुष्यात हे पतंग आपला वारसा ठेवून जातात.
रामेश्वर मुंढे, पर्यावण अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT