Uday Samant  esakal
कोकण

'त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली, तर साडेतीन लाखाच्या मताधिक्क्यानं विजयी करू'; मंत्री सामंतांचं कोणाबद्दल विधान?

'आमदार भास्कर जाधव यांचे काय सांगू? ते बारामतीमधून देखील निवडणूक लढवतील.'

सकाळ डिजिटल टीम

आमच्याबरोबर भाजप, राष्ट्रवादी गट, आरपीआय आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जागा वाटपाबाबत आमचे तीन नेते एकत्र बसतील व निर्णय घेतील.

चिपळूण : आमदार भास्कर जाधव यांचे काय सांगू? ते बारामतीमधून देखील निवडणूक लढवतील. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. भाषण काय मीही करतो, त्यामुळे बोलायला काय जाते? प्रत्यक्षात जनता ठरवते, कोणाला विजयी करायचे ते. लोकशाहीत ज्यांच्या नशिबात असते तोच विजयी होतो, अशा शब्दात पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार भास्कर जाधव यांच्या भाषणाचा समाचार घेतला.

शहरातील बहादूरशेखनाका येथे स्वामी मंगल कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची पत्रकार परिषद झाली. या वेळी शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते. या वेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री सामंत म्हणाले, ‘आता अजित पवार राष्ट्रवादी गट सत्तेत सहभागी झाला आहे.

आमच्याबरोबर भाजप, राष्ट्रवादी गट, आरपीआय आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्यादृष्टीने जागा वाटपाबाबत आमचे तीन नेते एकत्र बसतील व निर्णय घेतील. तो सर्वांना मान्य असेल. आमच्या नेत्यांना महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीची माहिती आहे. त्या त्या ठिकाणची ताकद आणि स्थिती याची नेत्यांना पूर्ण कल्पना आहे.’

आमदार जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या वक्तव्यांवर ते म्हणाले, ‘ते कुठून निवडणूक लढवतील हे तेच ठरवतील. आपल्याला त्यात स्वारस्य नाही. मी राज्याचा नेता आहे. इतक्या खालच्या पातळीवर मी लक्ष देत नाही. आमदार जाधवांनी बारामती, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी कोठूनही निवडणूक लढवावी, त्यांचा तो अधिकार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

किरण सामंत यांना विजयी करू..

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत पालकमंत्री सामंत म्हणाले, किरण सामंत हे आपले मोठे बंधू आहेत. त्यामुळे त्यांनी कोणता राजकीय निर्णय घ्यावा, हा त्यांचा निर्णय आहे. जर त्यांनी लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आणि उमेदवारी मिळाली तर शिवसेना पक्ष म्हणून त्यांना साडेतीन लाखाच्या मताधिक्क्याने विजयी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT