LokSabha Election Ajit Pawar Sunil Tatkare esakal
कोकण

Loksabha Election : 'रायगड लोकसभेची जागा मीच लढवणार'; अजितदादांच्या 'त्या' घोषणेनंतर तटकरेही ठाम

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रायगडाच्या जागेची नुकतीच घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

रायगडच्या जागेवरून महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रोहा : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रायगडाच्या जागेची घोषणा केल्यानंतर रायगड लोकसभेची (Raigad LokSabha Election) जागा मीच लढवणार, असे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी ठामपणे सांगितले. रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत क्षेत्रातील महामार्ग ते गोवे, मुठवली व शिरवली ते राष्ट्रीय महामार्गापर्यंत रस्त्याचे रुंदीकरणाच्या भूमिपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात झाला.

या वेळी मनोगत व्यक्त करताना खासदार सुनील तटकरे बोलत होते. महाराष्ट्र सरकार प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अंतर्गत खांब ते शिरवली, मुठवली बु. गोवे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २) पार पडले.

या वेळी मुठवली ग्रामस्थांनी नदीकडे जाणारा रस्ता, तर गोवे नदीला संरक्षक भिंतीची मागणी केली. सरपंच महेंद्र पोटफोडे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाची प्रस्तावना नंदकुमार मरवडे, नरेंद्र पवार यांनी केली. तर आभार पांडुरंग जाधव यांनी मानले.

या वेळी व्यासपीठावर रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, बाबुराव बामणे, नारायण धनवी, वसंत मरवडे, मनोज शिर्के, संजय मांडुळस्कर, सरपंच महेंद्र पोटफोडे, किरण मोरे, उपसरपंच रंजिता जाधव, नरेंद्र जाधव, तानाजी मोरे, बालकृष्ण भोसले, रमण कापसे, लहू पिंपळकर, भाऊ कापसे, राकेश कापसे, संदीप जाधव, प्रवीण पवार, राजेंद्र जाधव, अनंता पवार, हरीचंद्र जाधव उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूलाचे उद्घाटन चर्चेत

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT