कोकण

Konkan Railway: कोकण रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम ! तुतारी एक्स्प्रेस दीड तास उशिराने

कोकण रेल्वेगाड्या उशीराने धावत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Konkan Railway Delayed: परतीला निघालेल्या चाकरमान्यांमुळे कोकण मार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना प्रचंड गर्दी आहे; मात्र जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला असून, अनेक गाड्या एक ते दीड तास उशिराने धावत आहेत.

मंगळवारी (ता. २८) रात्रीची तुतारी एक्स्प्रेस दीड तास उशिराने आली.
सोमवारी कोचुवेल्ली एक्स्प्रेस विलंबाने धावल्यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सोमवारी सुमारे आठ गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने प्रवाशांना रेल्वेस्थानकावर ताटकळत राहावे लागले.

रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होण्यामागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. दिवाळी सुट्टीचा हंगाम संपुष्टात आला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून दीपावली सुट्टीसाठी गावी आलेले चाकरमानी परतीच्या मार्गाला लागले आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्या हाऊसफुल्ल आहेत.


सोमवारीही सर्वच रेल्वेगाड्यांना प्रवाशांची गर्दी उसळली होती. त्या त्या स्थानकात दाखल होणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू असताना त्यात उशिराने धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची भर पडत आहे. (Latest Marathi News)

त्याचा प्रवाशांना मनस्ताप होत आहे. उधना-मंगळूर स्पेशल, सीएसएमटी-मांडवी एक्स्प्रेस, मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस, मंगळूर-सीएसएमटी एक्स्प्रेस, एर्नाकुलम- एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस, निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस, कोचुवेल्ली-एलटीटी साप्ताहिक एक्स्प्रेस विलंबाने रवाना झाल्या.

गेल्या चार दिवसांपासून रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बिघडले आहे. मंगळवारी रात्रीही ही परिस्थिती कायम आहे. काल रात्री ११ वाजता रत्नागिरी स्थानकात येणारी तुतारी साडेबारा वाजता आली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT