रत्नागिरी :- लॉकडाउनच्या काळात जीवनावश्यक वस्तू आणि श्रमिकांच्या घरवापसी साठी अहोरात्र मेहनत घेतलेल्या कोकण रेल्वेने याच कालावधीत आपली मान्सूनपूर्व सुरक्षा उपाययोजनांची कामे हि पूर्ण केली आहेत . १० जून पासून कोकणरेल्वे च्या मार्गावर मान्सून वेळापत्रक लागू होत असून सुरक्षेचे उपाय म्हणून संपूर्ण मार्गावर ९७४ कर्मचारी २४ तास पेट्रोलिंग साठी तैनात केले जात आहेत . पावसाळ्याच्या काळात संपूर्ण वहातूक सुरक्षित व्हावी यासाठी सुरक्षा उपाययोजनांची सगळी कामे कोकण रेल्वे कडून पूर्ण करण्यात आली आहे .
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे कडून कोलाड ते ठोकूर या आपल्या ७४० किलोमीटर च्या पट्यात मान्सून पूर्व कामांना काही दिवसांपूर्वी सुरवात करण्यात आली होती . यात प्रामुख्याने पावसात कोकण रेल्वेच्या मार्गावर पाणी येऊ नये यासाठी पाण्याचे मार्ग मोकळे करणे आणि मार्गानजीकच्या कटिंग ची पहाणी करून धोकादायक वाटणारी कटिंग काढून टाकणे याला प्राधान्य देण्यात आले. गेल्या काही वर्षात केलेल्या सतत च्या उपाययोज़नानी आणि घेतलेल्या खबरदारी मुळे गेल्या सात वर्षात मार्गावर दरड व माती येण्याचे प्रकार खूप कमी झाले आहेत.
मान्सूनच्या काळात आता संपूर्ण कोकण रेल्वेच्या मार्गावर ९७४ कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २४ तास गस्त घातली जाणार आहे. जी धोकादायक कटिंग आहेत इथे विशेष उपाययोजना केल्या गेल्या असून या ठिकाणी २४ तास कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार आहे . अशा ठिकाणांवर रेल्वेचा वेग हि नियंत्रित ठेवण्यात येणार आहे . आपत्कालीन स्थितीत तात्काळ मदत मिळावी यासाठी ठराविक अंतरांवर पोकलेन मशिन्स सारखी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहेत .
मुसळधार पाऊस पडत असताना रेल्वेचा वेग ताशी ४० किमी असावा अशा सूचना लोकोपायलट ला देण्यात आल्या आहेत तर आपत्कालीन स्थितीत मदतीकरिता असिडेन्ट रिलीफ मेडिकल व्हॅन रत्नागिरी आणि वेरना गोवा इथे तैनात ठेवण्यात आल्या आहेत . लोकोपायलट आणि गार्ड ना वॉकी टॉकी यंत्रणा पुरवण्यात आल्या आहेत . तर मार्गावर पूर्वी पासून एक एक किलोमीटर अंतराकार्यरत असलेली संपर्क यंत्रणा मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तपासून सज्ज करण्यात आली आहे .
सॅटेलाईट फोन सारखी अत्याधुनिक यंत्रणाही रिलीफ व्हॅन मध्ये सुसज्ज ठेव मुसळधार पावसाच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्याची खबर देणारी यंत्रणा मार्गावर तीन पुलांवर ठिकाणी सुसज्ज आहे . पुराचे पाणी धोकादायक पातळीच्या वर आल्यास हि यंत्रणा अलर्ट करते . याचबरोबर माणगाव , चिपळूण ,रत्नागिरी ,विलवडे , कणकवली ,मडगाव , कारवार , भटकळ , आणि उद्दपी येथे पर्जन्य मापक यंत्रणा मार्गावरील ९ स्थानकात सुसज्ज असून अतिवृष्टी काळात हि यंत्रणा सूचना करेल .
मान्सूनच्या काळात बेलापूर,रत्नागिरी आणि मडगाव या तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत राहून रेल्वेच्या सुरक्षित वाहतुकीवर लक्ष ठेवून राहील . कोकण रेल्वेच्या मार्गावर मान्सून वेळापत्रक १० जून २०२० ते ३१ ऑक्टोबर २०२० या कालावधीसाठी कार्यान्वित राहील अशी माहिती कोकण रेल्वे कडून देण्यात आहे . पावसाळयातील प्रवाश्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कोकणरेल्वेने सर्व त्या सुरक्षा उपाया सह सज्ज झाली आहे .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.