Kokan: मासेमारीला ब्रेक, दरात मोठी वाढ  sakal news
कोकण

Konkan: कोकण किनारपट्टीवर मत्स्य विद्यापीठ केव्हा?

कोकणातील प्रसिद्ध हर्णै बंदरात नांगरून ठेवलेल्या मच्छीमारी नौका.

सकाळ डिजिटल टीम

भारत जगात मत्स्योत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर तर कोळंबी उत्पादनात प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील एकूण मत्स्योत्पादनापैकी ७२ टक्के उत्पादन ७२० कि. मी. लांबीच्या कोकण किनारपट्टीवर होते. त्यातील १२०० कोटीचे उत्पादन निर्यात होत असताना देखील मत्स्यविज्ञान विद्यापीठ कोकण किनारपट्टीला नाही. कोकणात मत्स्य विद्यापीठ कधी होणार, असा सवाल कोकणविषयक प्रश्नांचे अभ्यासक अॅड. विलास पाटणे यांनी दिली.


विद्यापिठासंदर्भात अॅड. पाटणे यांनी सांगितले, कोकणपासून दोन हजार कि. मी. अंतरावरील नागपूरच्या पशूविज्ञान विद्यापीठ केवळ विदर्भाला खुश करण्याकरिता राजकीय दबावामुळे तिकडे नेण्यात आले.

गोड्या पाण्यातील केवळ १.५७ लाख मेट्रिक टन मत्स्योत्पादनाकरिता नागपूर कॉलेज सुरू करणे हे एकवेळ समजण्यासारखे आहे; परंतु १९९८ ला पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुरात अस्तित्वात आल्यानंतर सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रे, पशुधन प्रशिक्षण व रत्नागिरीतील मत्स्य विज्ञान महाविद्यालय नागपूरच्या पशुविज्ञान विद्यापिठाला जोडण्याचा उफराटा निर्णय झाला.

महाराष्ट्रातून बरीच ओरड झाल्यानंतर १७ नोव्हेंबर २००० ला महाराष्ट्र सरकारने नोटिफिकेशन काढून मत्स्य विज्ञान महाविद्यालय दापोलीच्या कृषी विद्यापिठाला संलग्न ठेवण्याचा निर्णय घेतला.
रत्नागिरीचे व नागपूरचे महाविद्यालय स्वतंत्र कायद्याने अस्तित्वात आली आहेत. साधारणत: ७ ते ८ वर्षांपूर्वी नागपूरमधील पशू व मत्स्यविज्ञान विद्यापिठाकडे पुरेसा निधी व कर्मचारी नसल्याने महाराष्ट्र विधीमंडळात या प्रश्नावर चर्चा उपस्थित झाली होती.

महाराष्ट्र सरकारतर्फे डॉ. मुगणेकर समिती नेमण्यात आली व समिती निर्णय देईल त्या ठिकाणी वर्षभरात कोकणात मत्स्यविज्ञान विद्यापीठ गठित करण्यात येईल, असे निःसंदिग्ध आश्वासन देण्यात आले; परंतु त्या मुणगेकर समितीचा अहवाल धूळखात पडला आहे. जेव्हा निर्णय करावयाचा नसतो तेव्हा अशा समिती नेमल्या जातात, अशी खंत अॅड. पाटणे यांनी व्यक्त केली.

मत्स्योत्पादनः चीन, जपान, भारत
अंतर्गत मासेमारीः चीन, भारत
गोड्या पाण्यात मासेमारी प्रथम - चीन
कोळंबी उत्पादन प्रथम - भारत

पदवीपर्यंतचे शिक्षण मिळावे
कोकणातील नद्या, खाड्या, समुद्र व ७० खाड्यांच्या भोवती असलेले १४ हजार ४४५ हे खाजण क्षेत्र मत्स्यशेतीला उपलब्ध आहे; परंतु त्यातील केवळ ५ टक्के क्षेत्र निमखाऱ्या पाण्यातील मत्स्यशेतीकरिता वापरले जाते. याउलट गुजरातमध्ये ५० टक्के वापरले जाते. कोकणातील विद्यार्थ्यांना फिशरिज इंजिनिअरिंगचे पदवीपर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे अॅड. पाटणे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT