koyana surgwell project startd remove the leak start from december in pofali ratnagiri
koyana surgwell project startd remove the leak start from december in pofali ratnagiri 
कोकण

कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलमधील गळती काढण्यासाठी हालचाली सुरु

मुझफ्फर खान

चिपळूण : कोयना प्रकल्पाच्या सर्जवेलमधील गळती काढण्यासाठी प्रकल्पाचे पोफळी येथील टप्पा 1 आणि 2 डिसेंबरमध्ये काही दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. वीज निर्मितीचे संकट उभे राहून नये यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून चौथ्या टप्यातून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती केली जाणार आहे. कोयना जलसिंचन विभागाच्या अधिकार्‍यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कोयना प्रकल्पाच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात एकूण आठ पेल्टन टर्बाइन युनिटसह समान पॉवरहाऊस आहेत. दोन टप्प्यात प्रत्येकी चार टर्बाइन्स आहेत. पहिल्या टप्प्यासाठी प्रत्येकी 70 मेगावॅट आणि दुसर्‍या टप्प्यासाठी 80 मेगावॅट क्षमतेची प्रत्येकी चार टर्बाईन आहेत. यातून 600 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. नवजा येथे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात नवजा टॉवर बांधण्यात आले आहे. या टॉवरमधील अंतर्भूत संरचनेतून धरणातील जलाशयाचे पाणी मुख्य शर्यतीच्या बोगद्यात नेले जाते. पुढे ते पाणी सर्जवेलच्या दिशेने प्रवास करते. 

सर्जवेलमध्ये येणारे पाणी पुढे चार प्रेशर शाफ्टमध्ये विभागले गेले आहे. या प्रेशर शाफ्टच्या माध्यमातून टर्बाइन्सला पाणी पुरवठा केला जातो. त्यानंतर वीज निर्मिती होते. वीजनिमिर्तीनंतर हे पाणी बोगद्याद्वारे चौथ्या टप्याच्या दिशेने सोडले जाते. टप्पा एक आणि दोनच्या उभारणी दरम्यान सर्जवेल बांधण्यात आली होती. सध्या या सर्जवेलला गळती लागली आहे. गळती काढण्यासाठी डिसेंबरमध्ये टप्पा एक आणि दोन बंद करण्यात येणार आहे. गळती काढण्यासाठी किती कालावधी लागेल हे निश्‍चित नाही. 

या दरम्यान 600 मेगावॅट वीज निर्मिती कमी पडू नये यासाठी चौथा टप्पा पूर्णक्षमतेने चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चौथ्या टप्यात प्रत्येकी 250 मेगावॅट क्षमतेचे 4 टर्बाईन आहेत. चौथा टप्यातून केवळ मागणीच्या काळात म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी वीज निर्मिती केली जाते. मात्र टप्पा एक आणि दोनचे काम सुरू झाल्यानंतर ते पूर्णहोईपर्यंत पूर्ण क्षमतेने चालविला जाणार  आहे.

"कोयना प्रकल्पाचे पोफळी येथील टप्पा एक आणि दोन बंद ठेवण्याबाबत महानिर्मिती कंपनीकडून अद्याप वेळापत्रक आलेले नाही. हे वेळापत्रक प्राप्त झाल्यानंतर गळती काढण्याबाबतच्या हालचाली सुरू होतील. डिसेंबरमध्ये गळती काढण्याचा प्रस्ताव आहे." 

- कुमार पाटील, कार्यकारी अभियंता कोयना सिंचन 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT