Koyana Dam
Koyana Dam Sakal
कोकण

कोयनेच्या दोन प्रकल्पासाठी टाटा पॉवर आग्रही ? खासगीकरणाचे वेध

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण: खासगीकरणाचे वेध लागलेल्या जलसंपदा विभागाकडून कोयनेचा तिसरा टप्पा आणि कोयना धरण (Koyna Dam) पायथा विद्युतगृह हे दोन्ही प्रकल्प टाटा पॉवरकडे (Tata)जाण्याची शक्यता असून भाटघर(Bhatghar Project) प्रकल्पाप्रमाणे कोयनेचे पॉवर हाऊस टाटा पॉवर कंपनीकडे जाण्याची शक्यता आहे.

कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पायथा वीजगृह व ३२० मेगावॅट क्षमतेचा तिसऱ्या टप्प्याच्या महानिर्मिती कंपनीने जलसंपदा विभागाबरोबर हे प्रकल्प चालवण्यासाठी केलेला ३५ वर्षाचा करार संपला आहे. महानिर्मिती कंपनीकडून हे प्रकल्प पुन्हा जलसंपदा विभागाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत. राज्याला प्रकाशमान करणाऱ्या कोयना जलविद्युत प्रकल्पाची निर्मिती जलसंपदा विभागाने केली आहे. जलसंपदा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या जलविद्युत संघटनेमार्फतही निर्मिती होते. प्रचलित कार्य नियमावलीनुसार हे प्रकल्प उभारणीनंतर भाडेपट्टी तत्वावर परिचलन देखभालीसाठी महानिर्मिती कंपनीकडे हस्तांतरित करण्यात येतात.

यानुसार २५९२.२७ स्थापित क्षमता असलेले २७ जलविद्युत प्रकल्प महानिर्मिती कंपनीकडे ३५ वर्षाकरिता भाडेपट्टीने करार करून हस्तांतरित केले होते. जलविद्युत प्रकल्पातून होणाऱ्या वीजनिर्मितीपासून योग्य महसुली रक्कम राज्य शासनास प्राप्त होणे आवश्यक असल्याने जलसंपदा विभागाने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून भाडेपट्टीची सुधारित रक्कम आयोगाच्या २७ ऑक्टोबर २००८ रोजीच्या आदेशाद्वारे निश्चित केली आहे. या आदेशानुसार वीर व भाटघर जलविद्युत प्रकल्पाचे नियत ३५ वर्षाचे आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे भाडेपट्टी मिळणे बंद झाल्यामुळे सदर प्रकल्प जलसंपदा विभागाकडे परत घेण्याचा निर्णय २०१० ला झाला आहे.

या दोन प्रकल्पांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करून परिचलन करण्यासाठी 'बांधा, वापरा, हस्तांतरित करा' या तत्त्वावर खासगी प्रवर्तकास देण्यात आला आहे. त्याच धर्तीवर कोयनेचे हे दोन प्रकल्प खासगी प्रवर्तकालात देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. यासाठी या क्षेत्रातील बलदंड नावे चर्चिली जात असली तरी टाटा पॉवर कंपनीचे नाव अग्रणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT