koyna dam overflow then In summer it will not light kokan marathi news 
कोकण

Good News : उन्हाळ्यात 'यामुळे' जाणार नाही लाईट...

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : राज्यातील वीजनिर्मितीसाठी कोयना धरणातून दहा महिन्यांत ४४ टीएमसी पाण्याचा वापर वीजनिर्मितीसाठी झाला असून, वीजनिर्मितीसाठी अद्याप २३ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर होणार आहे. सध्या कोयना धरणात ७३.७० टीएमसी इतका सर्वाधिक व मुबलक पाणीसाठा असल्याने चालू वर्षी पाण्याअभावी वीजनिर्मिती बंद पडणार नाही. परिणामी, राज्यावर ऐन उन्हाळ्यात भारनियमनाचा भार पडण्याची शक्‍यता मावळली आहे. 

या वर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत कोयनेतून दोन हजार १५८ दशलक्ष युनिट इतकी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. गतवर्षी जूनपासूनच कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असल्यामुळे धरणात पाण्याची उच्चांकी आवक झाल्याने धरण तीन वेळा ओव्हरफ्लो झाले. परिणामी धरणातील पाणी नियंत्रणासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे १६ फुटांपर्यंत उचलण्यात आले. धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज या पर्जन्यमापन केंद्रावर तर सर्वाधिक म्हणजे १० हजार मिलिमीटर इतक्‍या ऐतिहासिक पावसाची 
नोंद झाली. 

तीन वेळा धरण ओव्हरफ्लो
परिणामी, धरणाच्या साठ्यात ऑक्‍टोबरपर्यंत तब्बल २३५.४२ टीएमसी इतक्‍या ऐतिहासिक पाण्याची आवक झाली; तर धरणातून १२७.४८ टीएमसी इतक्‍या प्रचंड पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.गतवर्षातील मुसळधार झालेल्या पावसामुळे कोयना धरण एका वर्षात तीनवेळा भरले. पाणी नियंत्रणासाठी तब्बल सातवेळा विसर्ग केला, मात्र जूनपासून ऑक्‍टोबरपर्यंत धरणातील पाण्याची पातळी कमी झाली नाही. त्यामुळे सध्या मार्च महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरी कोयना धरणात दहा महिन्यांची वीजनिर्मिती करण्यात आली असून आजपर्यंत ती दोन हजार १५८ दशलक्ष युनिट इतकी झाली आहे. 

अजून दोन महिने पाणीसाठ्याचा वापर
कृष्णा पाणीवाटप लवादानुसार अजून दोन महिने पाणीसाठ्याचा वापर होणार असून, त्यासाठी धरणात अद्यापही ७३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला चालू वर्षातही भारनियमनाची शक्‍यता नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT