Kunkeri Villagers Agitation On Mudhura Parab Death Or Murder
Kunkeri Villagers Agitation On Mudhura Parab Death Or Murder  
कोकण

मधुराची आत्महत्या नव्हे हत्या; ग्रामस्थांचा दावा

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - कुणकेरी येथील मधुरा मिलिंद परब हिची आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप करत आज कुणकेरी व इन्सुली ग्रामस्थांनी येथील पोलीस ठाण्यात मोर्चा काढला. या प्रकरणात गुन्हा दाखल असलेली सासू यामागील सूत्रधार आहे. दुर्दैवाने तिला अटक झालेली नाही. तिला तात्काळ अटक करा, तिला अटक न झाल्यास येथील पोलीस ठाण्यासमोर दोन्ही गावातील ग्रामस्थ मिळून उपोषण छेडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

ग्रामस्थांच्या दाव्यानुसार - मधुरा हिची आत्महत्या नसून तिच्या पती, दीर, सासरा व सासू यांनी मिळून केलेली तिची हत्या आहे. चार महिन्यांचा मुलगा असताना कुठलीही विवाहिता आत्महत्या करण्याचा विचारही करू शकत नाही. त्यामुळे तिची तिच्या सासरच्या कुटुंबीयांनी हत्या केली. या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी याआधी नातेवाईकांनी केली होती. यातील गुन्हा दाखल असूनही सासूला अटक झाली नव्हती. यासाठी या प्रकरणातील सूत्रधार व मुख्य संशयित असलेल्या तिच्या सासूला तात्काळ अटक करा, अशी मागणी मोर्चातील दोन्ही गावातील ग्रामस्थांनी केली.

सासूकडून मधुराचा छळ

यावेळी विकास केरकर यांनी या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सासूला तात्काळ अटक करा व त्यानंतरच पुढील कारवाई करा. मधुरा हीचा तिने सुरुवातीपासूनच छळ केला. तिने गळफास घेतला तर तिचा मृतदेह खाली का काढून ठेवला आणि गळफास घेतलेल्या स्थितीत पोलिसांना का कळवले नाही, याची आधी चौकशी करा, अशी मागणी केली. 

सासरच्या लोकांकडून घातपातच

गुरू पेडणेकर म्हणाले, ""पोलिसांच्या कार्यवाहीबद्दल आमचे काहीही म्हणणे नाही; मात्र मधुरा हिची आत्महत्या नसून सासरच्या लोकांकडून केलेला घातपातच आहे. त्यामुळे त्यादिशेने तपास करून चारही संशयितांना कठोर शिक्षा असलेली कलमे लावावी. यातील वस्तुस्थिती बाहेर काढावी.'' 

लहान मुलाचे कारण देऊन टाळली अटक

यावर पोलीस निरीक्षक धनावडे यांनी चारही संशयितांवर गुन्हा दाखल आहेत. तपास योग्य प्रकारे सुरू आहे. तपासात समोर आलेल्या मुद्‌द्‌यांचा उहापोह करून संशयितांना कठोर शिक्षा कशी होईल याचा विचार केला जाईल असे आश्‍वासन यावेळी उपस्थितांना दिले.  यावर केरकर यांनी पोलिसांचे आम्हाला सहकार्य नक्कीच आहे; परंतु मधुरा हिच्या सासूला लहान मुलाच कारण देऊन अटक न होणे हे कुठेतरी आम्हाला चुकीचे वाटत आहे. ही गोष्ट कुठच्या कायद्यात किंवा तत्वात बसत नाही असे सांगितले. यानंतर तेथील उपस्थित इन्सुली व कुणकेरी ग्रामस्थांनी कारवाई तात्काळ न झाल्यास दोन्ही गावातील ग्रामस्थ येथील पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण छेडतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. 

प्रकरणाची पार्श्‍वभूमी 

यावेळी पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे ग्रामस्थांनी निवेदन देण्यात आले. मधुरा परब हिने 15 डिसेंबरला आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती, दिर व सासरा तिघांना अटक झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल असूनही पोलिसांनी सासूला अद्याप अटक केलेली नाही. या पार्श्‍वभूमीवर हा मोर्चा काढण्यात आला. 
 

गुन्हाचा तपास सुरू

याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल असून या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान जे पुरावे पोलिसांच्या हाती लागतील त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई होईल. 
- सुनील धनावडे, पोलिस निरीक्षक, सावंतवाडी  

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT