Lankdown but continued to hard work in ratnagiri kokan marathi news 
कोकण

लाँकडाऊनमध्ये भोकरीच्या माळावर हा एकटा तरुण करतो तरी काय... ?

सिध्देश परशेटये

संगमेश्वर (रत्नागिरी) : कोकणातील भोकरीच्या माळावर जंगल परिसरात हा एकटा तरुण करतो तरी काय ?  लांबून त्याचे हावभाव आणि व्यायाम पाहिल्यावर कोणी हसेल पण त्याच्याशी बोलल्यानंतर मात्र त्याचं झपाटले पण जिद्द आणि कठोर मेहनत पाहून अचंबा वाटतो. त्याचे हे सारे कष्ट म्हणजे लष्करात जाण्याची पूर्व तयारी आहे. पाठीला बारा किलो चा टायर बांधून धावणारा हा तरुण सध्या लाँकडाऊनमध्ये संगमेश्वर तालुक्यातील देवळे गावात अडकला आहे.

तो मुंबईतून गावात आला आणि  लाँकडाउनमध्ये अडकला पण येथील त्याचा व्यायाम आणि दिनक्रम पाहून सारेच थक्क होतील. अशा कठोर मेहनत घेणाऱ्या सुचय संजय मोरे याने सकाळ'शी बोलताना सांगितले की, मला लहानपणापासून च लष्करात जाण्याची ईर्षा आहे. देवळे माझे मुळगाव माझे बारावीपर्यंतचे शिक्षण येथील एस.एन.कानडे हायस्कूलमध्ये झाले. सध्यस्थितीत सुचय हा डोंबिवली येथे राहतो. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तो परेल ( मुंबई ) येथे नाईट काँलेज मध्ये शिक्षण घेउन दिवसा कँटरिंग मध्ये कामाला जातो.

सुट्टी च्या दिवशी कल्याण येथील श्री करिअर अँकडमी मध्ये लष्करी प्रशिक्षणासाठी जातो. तर नित्याची कामे आणि शिक्षण यामधुन वेळ काढून दर शनिवारी विलेपार्ले येथील साठे महाविद्यालयाच्या प्राणांगणात ३ महाराष्ट्र बटालियन मुंबई च्या माध्यमातून सुरु असलेले रायफल प्रशिक्षण, परेड यासह लष्करातील विविध चित्तथरारक कसरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी जातो.

लाँकडाऊन मध्ये अडकला पण मेहनत सुरुच
लष्करात जाण्यासाठी सुचय ची ही अंगमेहनत तब्बल दीड वर्ष सुरू आहे. वयाच्या पंधराव्या वर्षा पासून लष्करात जाण्याची इच्छा बाळगुन असलेला हा ग्रामीण भागातील तरुण युवा वर्गासाठी एक उर्जाच आहे. मुंबई सुरु असलेले लष्करी प्रशिक्षण हे पूर्णपणे मोफतच आहे. सुचय चे देवळे वाणेवाडी येथे राहते घर आहे. त्याचा जन्म इथलाच त्याचे वडील संजय हे नोकरीच्या निमित्ताने दोन  वर्षा पूर्वी डोंबिवली येथे आपल्या पत्नी व मुलासह रहायला गेले.

शिमग्याच्या निमीत्ताने  तो गावी आला ​अन्

सुचय चे मोठे दोन्ही भाऊ देखील आपल्या वडीलांना हातभार लावण्यासाठी नोकरी करतात. सुचय हा धाकटा शिमग्याच्या निमीत्ताने गावी आला होता. गावचे घर सणासुदीला ला फक्त उघडले जाते. पाडव्याची गुढी उभी करुन तो पुन्हा मुंबई त जाणार होता.पण अचानक कोरोना च्या पाश्वभुमीवर लाँकडाऊन ची घोषणा झाली. आणि तो गावीच अडकून पडला. पण अशाही परिस्थितीत त्याने आपले ध्येय गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. शेजारी असलेले नातेवाईक अमेय नसरे यांचा या तरुणाला चांगला पाठिंबा मिळत आहे. आई- वडील आणि दोघेही भाऊ मुंबईत असल्यामुळे नसरे यांच्याकडेच गेले काही दिवस सुचय राहत आहे. या लाँकडाऊनमुळे मुळे अनेकांच्या पुढे करायचे काय ? हा प्रश्न आहे. पण सुचय हा गावी अडकलेल्या सार्याच तरुणांसाठी एक प्रेरणा ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

Latest Marathi News Updates : येवल्यात तासाभरापासून मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT