कोकण

संगमेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीनजण जखमी

सकाळवृत्तसेवा

देवरूख - घराच्या पडवीत कुत्र्यावर हल्ला करणाऱ्या बिबट्याने थेट घरात प्रवेश करून तिघांना गंभीर जखमी केले. आंबवली (ता. संगमेश्‍वर) येथे आज पहाटे ही धक्‍कादायक घटना घडली. दरम्यान, जखमींवर रत्नागिरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे आंबवली-तळीचीवाडी येथील मोहन हरिश्‍चंद्र खामकर यांच्या घराच्या पडवीत असलेल्या कोंबड्या व कुत्र्यांच्या दोन पिलांवर बिबट्याने हल्ला केला. यामुळे त्यांनी गोंगाट केला. आवाजामुळे जागे झालेल्या मोहन यांनी घराचे मागील दार उघडले. त्यावेळी बिबट्या तिथे कुत्र्याचे पिलू खात बसला होता. मोहन यांना समोर पाहून त्याने त्यांच्यावर हल्ला करून घरात प्रवेश केला.

या प्रकारानंतर मोहन यांच्या पत्नी मनीषा धावत आल्या. बिबट्याने त्यांच्यावरही हल्ला चढविला. अवघ्या काही सेकंदांत झालेल्या या प्रकाराने भेदरलेल्या खामकर दांपत्याने आरडाओरड करत घराच्या पुढील भागात प्रवेश केला. त्यांची आरडाओरड ऐकून शेजारच्या श्रद्धा विष्णू खामकर या धावत आल्या. दोघांनाही रक्‍ताच्या थारोळ्यात पाहिल्यावर त्यांनी पाणी आणण्यासाठी स्वयंपाक घरात धाव घेतली. तिथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने श्रद्धावर हल्ला केला. यामध्ये त्याही जखमी झाल्या. यातून पळत सुटका करणाऱ्या श्रद्धा यांनी स्वयंपाकघराचे दार लावून बिबट्याला आत कोंडले. 

शेजारचे सर्व ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी जखमींना प्रथम देवरूख ग्रामीण रुग्णलयात, तिथून रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पहाटे ५ वाजता वनाधिकारी सुरेश उपरे, वनरक्षक सागर गोसावी, एन. एस. गावडे, शर्वरी कदम यांनी या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बिबट्याने मागील दरवाजा उचकटवून पळ काढला होता. वन विभागाने या घटनेचा पंचनामा केला.

तालुक्‍यातील दुसरी घटना 
गेले काही महिने तालुक्‍याच्या विविध भागांत बिबट्याच्या धुमाकुळाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. गेल्या वर्षभरात तालुक्‍यात सहा बिबटे सापडले. यातील दोघांचा मृत्यू झाला, तर चार जिवंत बिबट्यांना सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. गेल्या दीड वर्षात बिबट्याने घरात घुसून ग्रामस्थांवर हल्ला करण्याची तालुक्‍यातील ही दुसरी घटना आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT