Lingeshwar Mandir Devasthana at Terav esakal
कोकण

Lingeshwar Temple : टेरवच्या लिंगेश्वर मंदिराला मिळाला ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा; पोफळीतील महाकाली मंदिराचाही समावेश

टेरव येथील लिंगेश्वर मंदिर (Lingeshwar Temple) देवस्थानला क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

यापूर्वी टेरव येथील श्री जय भवानी वाघजाई देवस्थानला ब वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे.

चिपळूण : तालुक्यातील टेरव येथील लिंगेश्वर मंदिर (Lingeshwar Temple) देवस्थानला क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. तीर्थस्थळाचा दर्जा मिळाल्याने स्वयंभू असलेल्या या निसर्गरम्य वातावरणातील मंदिराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. याशिवाय तालुक्यातील पोफळी येथील महाकाली मंदिराचाही क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र यादीत समावेश करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वीच पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. बैठकीत टेरव येथील लिंगेश्वर मंदिर देवस्थान, मौजे पोफळी येथील महाकाली मंदिर (Mahakali Temple), रत्नागिरी तालुक्यातील विल्ये येथील श्री सोमेश्वर व वाघजाई मंदिर, डोर्ले येथील श्री स्थानेश्वर मंदिरास क वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र, यात्रास्थळाचा दर्जा मिळाला आहे. टेरव येथील लिंगेश्वर मंदिर सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वीचे असून ते स्वयंभू आहे.

निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या या मंदिराचा ग्रामीण यात्रास्थळात समावेश होण्यासाठी सरपंच किशोर कदम यांनी मोठी मेहनत घेतली. यासाठी सरपंच कदम यांनी आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पाठपुरावा केला.

जिल्हा नियोजनच्या बैठकीत लिंगेश्वर मंदिराला क वर्ग ग्रामीण पर्यटनाचा दर्जा देण्यात आला. लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू लिंगेश्वर मंदिरास ग्रामीण यात्रास्थळास मान्यता मिळाल्याने मंदिर आणि परिसरातील विकासात्मक कामांना प्राधान्य मिळणार असल्याचा विश्वास टेरव सरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांनी व्यक्त केला.

वाघजाई देवस्थानला ‘अ’ वर्ग मिळण्यासाठी प्रयत्न

यापूर्वी टेरव येथील श्री जय भवानी वाघजाई देवस्थानला ब वर्ग पर्यटनाचा दर्जा मिळाला आहे. अ वर्ग पर्यटनात या मंदिराचा समावेश व्हावा यासाठी सरपंच किशोर कदम यांचा पाठपुरावा सुरू आहे. याबाबतचा प्रस्तावही केंद्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडे पाठवला आहे. त्याला देखील मंजुरी मिळेल, असा आशावाद सरपंच व ग्रामस्थांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missing Link: मिसिंग लिंक मार्गावर पुणे–मुंबई वाहतूक बंद; मुंबईहून येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग सुरळीत

Kolwan Rain : जोरदार पावसामुळे कोळवण खोऱ्यातील जनजीवन विस्कळित; वळकी नदीचे रौद्र रूपामुळे अंतर्गत पुलांवरुन पाणी तर ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी

Latest Marathi News Update: दिवसभरातील पावसाचे सर्व अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Khadaki Rain : खडकी भागात मुसळधार पाऊस; गुरुद्वारा आणि टीकाराम महाविद्यालय परिसरात पाणीच पाणी

Computer Typing Examination : नाशिक जिल्ह्यातील संगणक टंकलेखन परीक्षा स्थगित; मालेगाव केंद्रावरील परीक्षा मात्र नियोजित वेळेनुसार..

SCROLL FOR NEXT