lockdown impact in mandangad 
कोकण

गांभीर्य नाहीच : मंडणगडात कामानिमित्त बाहेरून आलेल्या नागरिकांनी गावी जाण्यास दिले अधिक महत्व ...

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण सापडला असतानाही तालुक्यात कामानिमित्त बाहेरून आलेल्या नागरिकांनी आपल्या गावाकडे जाण्यास अधिक महत्व देत ग्रामीण रुग्णालयासमोर तपासणीसाठी गर्दी केली होती. तसेच शहर परिसरात व बाजारपेठेत नागरिक मोठ्या संख्येने उरतल्याने सोशल डिस्टन्सला हरताळ फसल्याची स्थिती होती. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसून आले.


 रविवारची रात्र मंडणगड तालुक्यासाठी खळबळजनक ठरली. विलगिकरण कक्षात कोरोन्टाईन केलेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे तालुक्यात सतर्कता निर्माण होणे अपेक्षित होते. मात्र दुसऱ्या दिवसापासून याउलट चित्र दिसून आले, कामानिमित्त तालुक्यात आलेले तालुकाबाहेरील मजूर नागरिकांनी आरोग्याचा दाखला मिळावा यासाठी ग्रामीण रुग्णालयासमोर गर्दी केली होती. 


शहरात चारचाकी, दुचाकी मोठ्या प्रमाणात धावत होत्या. नागरिकांची वर्दळही मोठ्या संख्येने होत होती. त्यामुळे तालुक्यात पहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतरही तालुकावासीय बेफिकीर असल्यागत वावरताना दिसत होते. प्रशासकीय यंत्रणा विविध पातळींवर कोरोनाचा मागोवा घेत कार्यरत झाली असल्याने तिडे तळेघर गावांत माहिती घेत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात व्यस्त झाली आहे. तालुक्यात पसरणारा कोरोना थांबवून कायमचा घालविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला नागरिक आपला जीव धोक्यात घालीत गावाकडे जाण्यासाठी उतावळे झाले आहेत. तर अनेकजण रोजच्या खरेदीसाठी गर्दी करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident: भरधाव मोटारीच्या धडकेत कोथरूडच्या तरुणाचा अंत; संगमनेर-नऱ्हे रस्त्यावर भीषण अपघात!

समुद्रात बुडून पती राहुलचा मृत्यू झाल्यानंतर आता पत्नीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणते- आम्हाला सगळ्यांनाच मोठा...

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा कायम, गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांग

Pune Crime: नारायणगाव येथे बेकायदेशीर तलवारी बाळगणाऱ्या तरुणास अटक, तलवारी जप्त व खंजीर जप्त..

Laptop Safety Tips : काय तुम्हीपण गादीवर लॅपटॉप ठेऊन चार्ज करताय-काम करताय? आजपासून बंद करा 'या' ३ चुका, नाहीतर होईल मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT