lockdown impact in sindudurg
lockdown impact in sindudurg 
कोकण

काळोख रात्रीचा आधार घेऊन तो चालत आंबोलीहून शिरोड्याच्या दिशेने निघाला अन्.....

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिधुदुर्ग) : आंबोलीहून शिरोड्याच्या दिशेने चालत जाणाऱ्या मारुती पाटील नामक या मळगाव येथील जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. काल रात्री अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. 

मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवासी असलेला हा ईसम शिरोडा येथे आपल्या कुटुंबीयांसमवेत राहत होता. त्यातील एखादा स्थानिक ठेकेदाराकडे तो गवंडीकाम करायचा. काल पहाटे चारच्या सुमारास चंदगड येथे जाण्यासाठी निघाला मात्र आंबोली येथून पोलिसांनी त्याला परत पाठवले.रात्री शिरोड्याच्या दिशेने जात असताना मळगाव येथे संशयास्पद रित्या आढळल्याने ग्रामस्थांनी त्याला तिथेच थांबवले व प्रशासनाला संपर्क साधून अखेर पोलिसांच्या स्वाधीन केले.

मात्र प्रशासनाला माहिती देऊन तब्बल दोन तास उलटले तरी कोणतीही हालचाल होत नसल्याने स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाच्या या भूमिकेबाबत तीव्र संताप व्यक्त केला. पोलीस प्रशासन व आरोग्य प्रशासन एकमेका कडे बोट दाखवत असल्याने स्थानिक कोरोना कमिटीच्या सदस्यांना त्याचा नाहक त्रास होत असल्याचे यावेळी माजी सभापती राजू परब यांनी सांगितले.यावेळी मळगाव सरपंच बाबू गावडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, पोलीस पाटील रोशनी जाधव, महेश खानोलकर, हेमंत खानोलकर, महेश शिरोडकर, हनुमंत पेडणेकर, सुधीर राऊळ, बाबी देवळी, उल्हास नार्वेकर, तुळशीदास नाईक, लक्ष्मण देवळी, राजू कासकर, प्रकाश वराडकर, राजन जाधव, अमित मांजरेकर आदी उपस्थित होते.


मूळ चंदगड येथील हा ईसम शिरोडा बाजारपेठेत राहतो. तेथील एका खाजगी ठेकेदाराकडे तो गवंडी काम करत असे. मात्र मागील महिना-दीड महिना हाताला काम नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यामुळे तो आपल्या गावी जाण्याच्या मनस्थितीत होता. मात्र, पत्नीचा विरोध असल्याने तो एवढे दिवस थांबून होता. बुधवारी पहाटे तो पायीच आपल्या गावी निघाला मात्र आंबोली पोलिसांनी त्याला परत शिरोड्याला पाठवले. रात्री संशयास्पदरित्या महागाव येथे तो सापडल्यामुळे ग्रामस्थांनी त्याला प्रशासनाच्या ताब्यात दिले.


कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात कोरोना समित्या स्थापन करण्यात आले आहेत. या समित्यांमध्ये सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य व गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या  समितीला प्रशासनाचे आवश्यक सहकार्य मिळत नसल्याचा आरोप यावेळी स्थानिक समितीच्या सदस्यांनी केला. 


मळगावात दोन वेळा अशा प्रकारे परप्रांतीय संशयास्पद लोकांना पकडण्यात आले आहेत. मात्र, दोन्ही वेळा पोलिस प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे स्थानिकांना त्वरित सहकार्य लाभले नाही असा आरोपही समितीच्या काही सदस्यांनी केला आहे. पोलीस प्रशासन महसूल प्रशासन व आरोग्य प्रशासन एकमेकाकडे बोट दाखवत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT