Lockdown in Ratnagiri will be relaxed with some restrictions Assurance of District Collector 
कोकण

रत्नागिरीत काही निर्बंधांसह लॉकडाऊन होणार शिथिल : जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन​

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : देशात व राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू असताना जिल्ह्यात सलग दुसर्‍यांदा लॉकडाऊन जाहीर झाल्याने सामान्य नागरिकांपासून व्यापारी मंडळी नाराज आहेत. त्यामुळे लोकभावना लक्षात घेऊन लॉकडाऊमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी भाजप शिष्टमंडळाने केली. त्या वेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यात काही निर्बंध ठेवून शिथिलता देऊ, असे आश्‍वासन दिल्याची माहिती भाजप द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.


रत्नागिरी जिल्ह्यात 1 ते 8 जुलै कडक लॉकडाऊन झाला. मात्र या कालावधीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे आजपासून पुन्हा लॉकडाऊन जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर केला. याबाबत चर्चा करण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्षांसह शहराध्यक्ष सचिन करमकर, सरचिटणीस बाबू सुर्वे आणि भाजयुमो शहराध्यक्ष विकी जैन यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली.त्या वेळी अ‍ॅड. पटवर्धन यांनी जिल्हाधिकार्‍यांना लोकांची भावना सांगितली.

100 दिवस लॉकडाऊन झाल्यानंतर लोकांची मानसिकता जपण्याची गरज आहे. जनता नाराज आहे. व्यापार बंद आहे आणि अनेकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या आहेत. या सर्व भावना लक्षात घेऊन लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यावी, असे पटवून देण्यात जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन  यशस्वी ठरले. त्यामुळे नक्कीच शिथिलता देऊ, अशी ग्वाही दिली.याशिवाय अ‍ॅड. पटवर्धन यांनी विविध प्रश्‍नांवर जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा केली. कोरोना लक्षणे न दिसणार्‍यांनाही चाचणीची परवानगी आणि खासगी रुग्णालयांना कोरोना तपासणीसाठी परवानगी द्यावी, या मागणीवर जिल्हाधिकार्‍यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवल्याचे सांगितले.

भाजप शिष्टमंडळाला जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन​

राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील कोविड सेंटरमध्ये गैरसोयी आहेत. जेवणासाठी कँटीन नाही. या प्रश्‍नावर स्थानिकांनी अर्ज केल्यास लगेच कँटीनचा ठेका देऊ, असे जिल्हाधिकार्‍यांनी अ‍ॅड. पटवर्धन यांना सांगितले. सर्व बँका सध्या पासबुक छापून देत नाहीत. त्यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व नोकरदारांची गैरसोय होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन सर्व बँकांना तसे आदेश देतो, असे जिल्हाधिकार्‍यांनी आश्‍वासन दिल्याचे अ‍ॅड. पटवर्धन म्हणाले.

साडवली केंद्रही बदलणार

संगमेश्‍वर तालुक्यातील साडवली येथे स्क्रिनिंग केंद्रामध्ये काही अडचणी आहेत. सध्या येथे पावसामुळे नागरिकांना बाहेर भिजत रांगेत उभे राहावे लागते हा प्रश्‍न जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी मांडल्यावर हे केंद्र अन्यत्र बदलण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

Sharad Pawar : 'देवाभाऊं'नी महाराजांचे नाव घेऊन बळीराजाकडे ढुंकून पाहिले नाही: शरद पवार

SCROLL FOR NEXT