कोकण

टिळकांचे पत्र महापुरात गेले वाहून ; शंभर वर्षाचा ठेवा नष्ट

होमरूल चळवळीविषयी होते पत्र; बाळशास्त्री जांभेकर-गंगाधरपंत टिळकांची चर्चा

मुझफ्फर खान -सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : लोकमान्य टिळकांच्या होमरूल चळवळीसाठी चिपळुणातील चिदानंद तपस्वी यांनी पाच रुपयांची देणगी पाठवली होती. देणगी मिळाल्यानंतर टिळकांनी तपस्वी यांना आभाराचे पत्र पाठवले. ते पत्र चिपळुणात २२ जुलैच्या महापुरात वाहून गेले. शंभर वर्षाचा हा मौल्यवान ठेवा वाहून गेल्याचे सांगताना लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रकाश देशपांडे यांना अश्रू अनावर झाले. (Lokmanya-Tilak-letter-chiplun-flood-Home-Rule-Movement-Donation-of-five-rupees-by-Chidananda-Tapasvi-akb84)

लोकमान्य टिळकांचे चिपळूणशी वेगळे नाते होते. त्यांच्या जन्मापूर्वी त्यांचे वडील गंगाधरपंत टिळक चिपळुणातील प्राथमिक शाळेवर शिक्षक होते.

त्या पत्राला १२ फेब्रुवारी २०२१ ला शंभर वर्षे पूर्ण झाली होती. येथील लोकमान्य टिळक वाचनालयाने ऐतिहासिक पत्राचा हा ठेवा जतन केला होता. (कै.) विलास गोगटे यांचे तपस्वी हे आजोबा. त्यांच्याकडे मिळालेले हे पत्र ‘लोटिस्मा’च्या वस्तूसंग्रहालयात ठेवले होते. याबाबत माहिती देताना ‘लोटिस्मा’चे कार्यवाह प्रकाश देशपांडे म्हणाले, शंभर वर्षापूर्वी चिपळुणातील चिदानंद तपस्वी (गोगटे) हे भिक्षेतून मिळणाऱ्या पैशातून सामाजिक कार्य करायचे. ते लोकमान्य टिळकांना खूप मानायचे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा आणि लोकमान्यांच्या राष्ट्रीय कार्यात जितकी मदत करता येईल तेवढी करायची हा त्यांचा बाणा. इंग्रजांच्या विरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळ सुरू केली. या चळवळीसाठी फंड व इतर यंत्रणा उभी करणे सुरू झाले. त्या वेळी चिदानंद तपस्वी यांनी भिक्षेतून मिळणारे पाच रुपये लोकमान्य टिळकांच्या होमरूल फंडासाठी पाठवले होते. शंभर वर्षापूर्वी पाच रुपयाला फार मोठी किंमत होती. त्यामुळे तपस्वी यांची देणगी मिळाल्यानंतर लोकमान्य टिळकांनी त्यांना १३ फेब्रुवारी १९२० ला पत्र लिहिले. देणगी दिल्याबद्दल तपस्वींचे आभार मानताना टिळकांनी पत्रात लिहिले होते की, आपल्यासारख्यांचे आशीर्वाद असल्यामुळे आमच्या कार्याला यश येईल हे सांगायला नको.

ईश्‍वर यश देईल. आपण रोजच्या निर्वाहाच्या भिक्षेतून काढून पाच रुपयाचा प्रसाद पाठवलात. तो होमरूल लीगकडे जमा केला आहे. या देणगीची किंमत रुपयांच्या संख्येवर नाही. ही ज्या रितीने, हेतूने आणि धार्मिक बुद्धीने गोळा झालेली आहे, त्याची किंमत अनमोल आहे, याची जाणीव आहे. यामुळे या देणगीचा स्वराज्य-संघातर्फे मी मोठ्या आनंदाने, अभिमानाने व भक्तीने स्वीकार करतो. आपले आशीर्वाद केळकर, खाडिलकर व इतरांना कळविले आहेत. चिपळूणला येऊन श्री परशुरामाच्या दर्शनाचा योग घडावा अशी इच्छा आहे, असे त्या पत्रात लिहिले होते. ते पत्र लोकमान्य वाचनालयाच्या वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आले होते.

बाळशास्त्री जांभेकर-गंगाधरपंत टिळकांची चर्चा

लोकमान्य टिळकांचे चिपळूणशी वेगळे नाते होते. त्यांच्या जन्मापूर्वी त्यांचे वडील गंगाधरपंत टिळक चिपळुणातील प्राथमिक शाळेवर शिक्षक होते. बाळशास्त्री जांभेकर घोड्याने किंवा पालखीने चिपळुणात यायचे आणि दोघांमध्ये तासन्‌तास गप्पा रंगायच्या, अशी आठवण देशपांडे यांनी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

T20 WC, IND vs ENG SF: भारत-इंग्लंड सामन्यासाठी वानखेडेवरील '७' नंबरची खेळपट्टी वापरली जाणार; २४ तासांत फिरला गेम... स्टेडियमवरून ताजे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Kolhapur Wrestling : कोल्हापूरच्या मातीचा गाजणार पुन्हा एकदा जलवा; कुंभी कारखान्याच्या कुस्ती स्पर्धेत ५०० हून अधिक पैलवान उतरणार आखाड्यात

Beed News : गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघड? बर्दापूर पोलिसांची मोठी कामगिरी; मूर्ती फाट्याजवळ १० लाख ८०० रुपयांचा मुद्देमाल पकडला, तिघांना बेड्या

SCROLL FOR NEXT