Lok Sabha eknath shinde devendra fadanvis
Lok Sabha eknath shinde devendra fadanvis esakal
कोकण

Loksabha Election : जागावाटपावरुन युतीत जुंपणार? शिंदे गटात अस्वस्थता, भाजपकडून कमळाचा प्रचार

मुझफ्फर खान

निवडणूक प्रमुख नेमल्याने पक्षांतर्गत वाद वाढणार नाहीत, याची भाजपच्या नेत्यांना खबरदारी घ्यावी लागेल.

चिपळूण : आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षाने (BJP) एकत्र लढविण्याचा निर्धार केला आहे. युतीत पूर्वी ठरल्यानुसार जागांचे वाटप होईल. त्यानुसार रत्नागिरीची जागा शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाला मिळेल, असा शिवसेनेला विश्वास वाटतो; परंतु भाजपकडून त्याला होकाराचे संकेत नाहीत.

रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघांचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. मात्र, भाजपच्या संघटनात्मक बांधणीच्या बैठकांमध्ये वारंवार कमळाचा उमेदवार निवडून आणायचा आहे, असेच कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबविले जात आहे. पक्ष देईल तो उमेदवार, असे वारंवार सांगितले जात असल्याने शिंदे गटातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

लोकसभेत भाजपची मदार उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार, राजस्थानसह महाराष्ट्र या मोठ्या राज्यांवर आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये राज्यातून भाजपचे (शिवसेनेसह) ४० पेक्षा अधिक खासदार निवडून आले आहेत. या वेळी भाजपने ४५ खासदार जिंकण्याचा निर्धार केला आहे. मोदी लाट आणि शिवसेनेची साथ यामुळे भाजपला दोन्ही वेळा जागा जिंकणे शक्य झाले होते. या वेळी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीशी लढत द्यावी लागणार आहे.

तीन पक्ष एकत्र लढल्यावर निकाल बदलतो, हे विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निकालांतून तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये अनुभवास आले. यामुळे या वेळी भाजपसमोर कडवे आव्हान असेल. उद्धव ठाकरेंच्या कोकणातील शिवसेनेत मोठी फूट पडली. रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघांत शिंदे गटाच्या गेलेल्या स्थानिक नेत्यांची ताकद किंवा मते आहेत. शिंदे गटाच्या ताकदीचा भाजपला अद्याप अनुभव आलेला नाही.

शिंदे गटाच्या आमदारांचा कितपत प्रभाव पडेल, याबाबत भाजपमध्येही साशंकता आहे. भाजपने सत्तेचा उपयोग आणि विविध प्रकारचे प्रयोग करून आपली व्होट बॅंक तयार केली आहे. मतदार संघनिहाय निवडणूक प्रमुख नेमताना पक्षाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले आहे. पक्षांतर्गत मतभेद वाढू नयेत, अशी खबरदारी पक्षाने घेतली. विधानसभेसाठी गेल्या वेळी पराभूत झालेल्या उमेदवारांनाच बहुसंख्य मतदार संघांमध्ये निवडणूक प्रमुख म्हणून नेमले आहेत.

भाजपच्या चिन्हावर निवडणूक

२०२४ मध्ये भाजपला ४०० चा आकडा गाठायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील हक्काच्या जागा भाजप आपल्याकडे ठेवणार आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपने तगडा उमेदवार दिला तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातील चित्र वेगळे असेल. त्यामुळे ही जागा शिंदे गटाला न सोडता शिंदे गटातील उमेदवाराला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची वेळ येऊ शकते.

स्थानिक स्वराज्य संस्थेसह सर्वच निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढणार आहे. आम्हाला कमळ हे चिन्ह लोकांपर्यंत पोचवायचे आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या. आम्हाला भाजपचा खासदार निवडून आणायचा आहे. पक्षाचा उमेदवार कोण असेल किंवा युतीचा उमेदवार कोण असेल, हे वरिष्ठ पातळीवर ठरेल.

- संतोष मालप, जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा

नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता

निवडणूक प्रमुख नेमल्याने पक्षांतर्गत वाद वाढणार नाहीत, याची भाजपच्या नेत्यांना खबरदारी घ्यावी लागेल. कारण, नेमणुका होताच काही ठिकाणी निवडणूक प्रमुखांचे अभिनंदन करणारे फलक झळकू लागले आहेत. उमेदवारीवरून निवडणूक प्रमुख व अन्य नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे भाजपने कमळचा उमेदवार निवडून आणायचा आहे, असा प्रचार सुरू केला. त्यामुळे भाजपच्या गोटात नक्की काय चालले, याबाबत संभ्रम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT