lote MIDC sakal
कोकण

लोटे 'MIDC'तील कंपनीला भीषण आग; गोडाऊन आगीत जळून खाक

कंपनीला लागणारा कच्चामाल या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता.

सकाळ डिजिटल टीम

खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील प्रिवी ऑरगॅनिक कंपनीचे गोडाऊनला रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागली. अचानक लागलेल्या आगीत कंपनीचे गोडावून भक्ष्यस्थानी पडले. कंपनीला लागणारा कच्चामाल या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. या कंपनीचा मुख्य प्लाट आणि अशोका सीएनजी गँस प्लांट जवळ असल्याने भीती मात्र कायम होती. (lote midc privi company godown fire)

रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. कंपनीसाठी लागणारा कच्च्या मालासह विविध प्रकारचे सॉलव्हटची गोडाऊनमध्ये साठवणूक करण्यात आली आहे. हे साँलव्हंट अत्यंत ज्वालाग्राही असल्याने आगीने क्षणात रौद्र रुप धारण केले. एमआयडीसीचे दोन अग्निशामक बंब आणि चिपळून, खेड नगरपालिकेचे अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग लागली तेव्हा गोडाउन मध्ये कोणी नव्हते यामुळे कोणाला दुखापत झाली नाही. मात्र मंगेश पवार नामक एका कामगाराला आगीतून पसरलेल्या वायुची बाधा झाली आहे. प्रिवी आँरगँनिक कंपनी आणि गोडावूनमध्ये सुमारे चाळीस मीटरचे अंतर आहे. ज्यावेळी आग लागली तेव्हा कंपनीमध्ये रात्रपाळीचे कामगार काम करीत होते. अग्निशमन दलाच्या जवानासह कंपनी व्यवस्थापनाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात सुमारे अडीच-तीन तासानंतर यश आले आहे. अशी माहिती घटनास्थळावरून प्राप्त झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

SCROLL FOR NEXT