maharashtra navnirman sena malvan mahavitaran 
कोकण

...तर महावितरणची तार कापू ; मनसेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

मालवण - लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात महावितरण कंपनीने ग्राहकांना मीटर रिडींगद्‌वारे वीज बील न पाठवता सरासरीनुसार बिल पाठवण्याचा निर्णय घेतला होता; परंतु आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर ग्राहकांना मोठ्या रकमेची वीज बीले येत असल्याच्या तक्रारी अनेकांकडून होत आहेत. लोकांचे व्यवसाय अडचणीत आलेत तर काहींच्या नोकऱ्या गेल्या असे असताना कोणाच्याही घरातील तसेच दुकानातील वीज जोडणी कापणी केल्यास महावितरणची तार कापू, असा इशारा मनसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. 

प्रभारी प्रादेशिक संचालक यांनी कोकण विभागातील कल्याण, भांडुप, रत्नागिरी आणि जळगाव परिमंडळातील मुख्य अभियंता सर्व अधीक्षक अभियंते आणि कार्यकारी अभियंता यांच्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्ससिंगच्या माध्यमातून वीज थकबाकीदारांची जोडणी खंडित करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील नागरिकांनाही मोबाईलवर पंधरा दिवसात वीज थकबाकी भरा, अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्याबाबत नोटिसा मिळत आहेत. हा निर्णय नागरिक व्यापारी व्यावसायिक यांच्यासाठी अन्यायकारक आहे. 

महावितरणने वीज खंडित करण्याबाबत घेतलेल्या धोरणाबाबत आज मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसे विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष इब्रामपूरकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी तालुका सचिव विल्सन गिरकर, उपतालुका अध्यक्ष उदय गावडे, मनसे शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर, मनविसे शहराध्यक्ष साईराज चव्हाण आदी उपस्थित होते. 


 तरीही तिप्पट बिले? 
यावेळी चर्चा करताना वीज बिल आता कोरोना पेक्षाही लोकांना भयंकर वाटू लागला आहे. लोकांकडे पैसे नाहीत आणि दुप्पट-तिप्पट बिल महावितरण आकारत आहे. त्याला काही संदर्भ आहे का? लोकांना इतके बील का आकारले जात आहे असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. वीज बिल योग्यप्रकारे द्या आणि कुठल्याही ग्राहकांची वीज जोडणी खंडित करू नका, नाहीतर महावितरणची तार मनसे कापेल, असा इशारा श्री. इब्रामपूरकर यांनी दिला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महावितरण कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त होता. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT