Ajit Pawar VS Sharad Pawar Esakal
कोकण

NCP Crisis : 'शरद पवार आपला ब्रॅण्ड, ते वर्षात पुन्हा पक्ष उभा करणार'; रत्नागिरीत साहेबांच्या समर्थनार्थ मेळावा

आता पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. आणखी तुकडे होण्याची वाट पाहू नका, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला.

सकाळ डिजिटल टीम

आता पक्षात फूट पडल्याचा दुसरा हादरा बसला; परंतु ९ आमदारांनी कशासाठी बंड केले, हेच काळत नाही.

रत्नागिरी : शरद पवार यांच्यासाठी बंड काही नवीन नाही. पक्ष कसा उभा करायचा, हे पवार साहेबांना बरोबर माहीत आहे. राजकारणातील ते विद्यापीठ आहेत. पुन्हा नव्याने ते आमदार-खासदार घडवतील. शरद पवार हे आपला ब्रॅण्ड असून मोठ्या जोमाने ते वर्षात पुन्हा पक्ष उभा करतील, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे निरीक्षक शेखर माने यांनी केले.

जे. के. फाईल्स येथील साई मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार यांच्या समर्थनार्थ मेळावा झाला. शेखर माने यांनी सुरवातीला जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय शरद पवार यांच्या समर्थकांची माहिती घेतली. तालुकाध्यक्ष, सेलचे प्रमुख, महिला पदाधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेतले.

जिल्ह्यात पक्षाची ताकद कमी होत गेली. निरीक्षक नेमले; परंतु रत्नागिरीकडे कधी आलेच नाहीत. याला पक्ष, नेमलेले पदाधिकारी जबाबदार आहेत. आता तरी वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींना सांगा. आता पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. आणखी तुकडे होण्याची वाट पाहू नका, असा सूर कार्यकर्त्यांनी लावला. जिल्ह्यातील दापोली, चिपळूण या भागातील पक्षाला फटका बसला आहे. स्थानिक आमदाराबरोबर पदाधिकारी गेले आहेत.

परंतु उर्वरित रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर, खेड, गुहागर आदी तालुक्यात राष्ट्रवादी आहे तिथे आहे. कोण कुठेही हललेले नाही. चंद्रशेखर माने म्हणाले, काहीतरी शिजत असते म्हणूनच या राजकीय घडामोडी घडतात. आपल्याला बंड काही नवीन नाही; परंतु जे गेले यांनी काही भलतेच उद्योग केले म्हणून त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणा लागल्या आहेत. सेनेत फूट पडली.

आता पक्षात फूट पडल्याचा दुसरा हादरा बसला; परंतु ९ आमदारांनी कशासाठी बंड केले, हेच काळत नाही. कामासाठी वय लागत नाही. भुजबळांना कोणी पुन्हा प्रतिष्ठा दिली सर्वांना माहीत आहे; परंतु तुम्हाला ग्वाही देतो, पुन्हा ही चूक होणार नाही. यापुढे प्रामाणिक काम करणाऱ्यानांच संधी दिली जाणार आहे.

आमची लढाई आम्हीच लढतोय

आपली नियुक्ती झाल्याचे वर्षभर नंतर आम्हाला कळले. पक्षवाढीसाठी कधी आला नाहीत. पक्षपातळीवर घेतेलेल निर्णय कधी आमच्यापर्यंत आलेच नाहीत. अनेक वर्षे आमची लढाई आम्ही लढत आहोत. रत्नागिरीत चिंता करण्याची गरज नाही. पक्षाकडे दुर्लक्ष करू नका. असे रोखठोक मत रत्नागिरी शहराध्यक्ष नीलेश भोसले यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT