mahavikas aghadi together election run in sangameshwar tehsil in ratnagiri decision take 
कोकण

महाविकास आघाडी होणार का ? राजकीय वर्तुळात लागले डोळे

सकाळ वृत्तसेवा

देवरूख (रत्नागिरी)  : संगमेश्‍वर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत १५ डिसेंबरला निघणार आहे. यामुळे आता नव्या वर्षात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी होणार, हे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.

तालुक्‍यात १२६ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ८० पेक्षा अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने या सर्व ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम सुरू आहे. येत्या १५ डिसेंबरला या सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण काढले जाणार आहे. जनतेतून सरपंच निवडीचा फडणवीस सरकारचा अध्यादेश विद्यमान महाविकास आघाडी सरकारने रद्द केल्याने आता सदस्यांमधूनच सरपंच निवड होणार आहे. परिणामी, सरपंचपदाच्या आरक्षणाला मोठे महत्व आले आहे.

संगमेश्‍वर तालुक्‍यात ६० टक्‍के ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे तर उर्वरित ग्रामपंचायती भाजप, राष्ट्रवादी व स्थानिक पातळीवरच्या आघाडीकडे आहेत. राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्याने तीनही पक्षांनी यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्रित लढवणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी संगमेश्‍वर तालुक्‍यात तीनही पक्षात समन्वय असल्याचे चित्र नाही. यामुळे या निवडणुकीत हे तीनही पक्ष एकत्र येणार की नाही याबाबत उत्सुकता वाढली आहे. 

एकत्र आल्यास शिवसेनेला अन्य दोन पक्षांना समान वाटा द्यावा लागू शकतो. परिणामी सेनेचे वर्चस्व आपोआप कमी होऊ शकते. याउलट शिवसेना स्वबळावर लढली तर त्यांना सर्व ग्रामपंचायती लढून चांगल्यापैकी यश मिळू शकते अशी स्थिती आहे. या वेळी तालुक्‍यात भाजप आणि शिवसेनेत जंगी सामना होण्याची चिन्हे आहेत.

‘राष्ट्रवादी’ही स्वबळावरच रिंगणात शक्‍य

तालुक्‍यात काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेपाठोपाठ ‘राष्ट्रवादी’ची ताकद आहे. आमदारही ‘राष्ट्रवादी’चेच असल्याने ‘राष्ट्रवादी’ही स्वबळावरच रिंगणात उतरू शकते. परिणामी, महाविकास आघाडी जुळताना कठीण होऊ शकते, असा मतप्रवाह आहे. पक्षाला अस्तित्वात ठेवण्यासाठी महाविकास आघाडी झाली तर काँग्रेसला संजीवनी मिळू शकते.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Padole Accident : काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा भीषण अपघात; कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले

करण जोहरने अनन्याला केला चुकीचा स्पर्श? नेटकरी संताप व्यक्त करत म्हणाले...'अभिनेत्रींना अशा स्पर्शांचं काहीच कसं...' Viral Video

Latest Marathi News Live Update : अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदी काठावर नवीन घाट बांधण्यासाठी 1 कोटी 90 लाख रुपयांची मंजुरी

Iran Attack Kuwait : कुवेतच्या वीजनिर्मिती आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणचा मोठा हल्ला; भारतीय कामगाराचा मृत्यू

Vidarbha News: पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल; सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

SCROLL FOR NEXT