Makarand Mhadalekar As Dapoli Taluka BJP President Ratnagiri Marathi News 
कोकण

दापोली भाजपच्या तालुकाध्यक्षपदी 'यांची' नियुक्ती

सकाळवृत्तसेवा

दाभोळ ( रत्नागिरी ) - भाजपच्या दापोली तालुकाध्यक्षपदी मकरंद म्हादलेकर यांची निवड करण्यात आली. श्रीराम (भाऊ) इदाते यांचा तालुकाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्याने नूतन तालुकाध्यक्ष निवडण्यासाठी शहरातील श्री मंगल कार्यालय येथे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्याची बैठक झाली. 

बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष व या निवडणुकीसाठीचे निरीक्षक राजूभाई रेडीज व जिल्हा सरचिटणीस केदार साठे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. माजी तालुकाध्यक्ष बावाशेठ केळसकर यांनी तालुकाध्यक्षपदी मकरंद म्हादलेकर यांचे नाव सुचविले. त्याला तालुका उपाध्यक्ष पांडुरंग पावसे व लऊ साळुंके यांनी अनुमोदन दिले. मकरंद म्हादलेकर यांच्याकडे यापूर्वी भाजपाचे दापोली तालुका सरचिटणीसपदाची जबाबदारी होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यातील पेण विधानसभा मतदारसंघात त्यांनी विस्तारक म्हणून काम केले आहे. 

तालुक्‍यातील 191 बुथपर्यंत भाजप सक्षमपणे वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आगामी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसह अन्य निवडणूका स्वबळावर लढविणार आहोत. जे सोबत येतील, त्यांना बरोबर घेऊन जास्तीत जास्त भाजपचे उमेदवार विजयी करणार आहे. 
- मकरंद म्हादलेकर, नुतन तालुकाध्यक्ष, भाजप  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना अमेरिकेतून पाठिंबा

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT