समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारी बरोबरच पर्यटन ठप्प Sakal
कोकण

मालवण : समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारी बरोबरच पर्यटन ठप्प

परिणामी पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला.

प्रशांत हिंदळेकर

मालवण : अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कालपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे मासेमारी बरोबरच सागरी पर्यटन आज ठप्प झाले. परिणामी पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला. दुपारनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता.

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सकाळ पासून बंद ठेवण्यात आली असल्याचे किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी स्पष्ट केले. गेले काही महिने समुद्रात कमी दाबाचे पट्टे तयार होत असल्याने सातत्याने समुद्रात वादळसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. याचा फटका मासेमारीबरोबरच सागरी पर्यटनालाही बसत आहे. सध्या पर्यटन हंगाम ऐन बहरत असताना अवकाळी पावसाचा फटका व्यावसायिकांना बसत असल्याचे दिसून येत आहे.

काल सायंकाळपासून शहर परिसरास मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांचेही गैरसोय झाली. सोसाट्याच्या वाऱ्यासह रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत होता. यात वीज पुरवठाही सातत्याने खंडित होत होता. मध्यरात्री उशिरा वीज पुरवठा पूर्ववत झाला.कालपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर आजच्या दुसऱ्या दिवशीही कायम होता. परिणामी येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या पर्यटकांची मोठी गैरसोय झाली. पाऊस व वारे यामुळे किनारपट्टीवरील जलक्रीडा प्रकार तसेच अन्य सागरी पर्यटनही बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना किनाऱ्यावरूनच किल्ले दर्शन व पर्यटनाचा आंनद घ्यावा लागला.

समुद्रातील वादळसदृश परिस्थितीमुळे येथील बंदरातील नौका कोळंब खाडीपात्रात उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून छोट्या प्रवासी होड्या (नौका), मासेमारी बोटी या कोळंब खाडी पात्रात सुरक्षित स्थळी उभ्या करून ठेवल्या आहेत. मोठ्या मासेमारी नौकां सुरक्षित ठिकाणी हलविल्या आहेत. समुद्रात ४५ ते ५५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. लाटांचा जोरही वाढेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी प्रवासी होडी वाहतूक तसेच सागरी व खाडी पात्रातील पर्यटन व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी. असे आवाहन बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मध्ये आज बंजारा समाजाच्या वतीने एल्गार मोर्चा काढण्यात आला

Dasara 2025: कंबरेला दोरी बांधून ७७ वर्षीय पुजाऱ्याने ओढल्या बारा बैलगाड्या; बिरोबाचा पारंपारिक दसरा महोत्सव

Shivaji Maharaj Video: छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील रिझर्व बँक पाहिली का? व्हिडिओ व्हायरल

Video: रावणाची दहा डोकी घेऊन फिरत होती राखी सावंत, अशाच अवतारात छम्मक छल्लो गाण्यावर नाच नाच नाचली, व्हिडिओ बघून तुम्ही पण हसाल

SCROLL FOR NEXT