बसफेरीवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक
बसफेरीवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक sakal
कोकण

मालवण : बसफेरीवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक

प्रशांत हिंदळेकर

मालवण : येथील एसटी आगारातून सुटलेल्या मालवण कट्टा सिंधुदुर्गनगरी या बसफेरीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान आनंदव्हाळ येथील मुख्य रस्त्यावर घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच एसटीच्या अधिकाऱ्यांनी आनंदव्हाळ येथे जात पाहणी केली. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सिंधुदुर्गातही गेले ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली होती. यात काल येथील आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने मालवण ओरोस मार्गावर पहिली एसटी बसफेरी सोडण्यात आली. आज सकाळी ९.०५ वाजता येथील आगारातून चालक अजित भोगवेकर व वाहक श्री. आंबोजकर हे मालवण कट्टा सिंधुदुर्गनगरी ही एसटी बसफेरी घेऊन निघाले.

बसमध्ये ओरोस येथे शासकीय कार्यालयातील तेरा कर्मचारी होते. बसफेरी आनंदव्हाळ येथे आली असता अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. दोघा अज्ञातांनी चालकाच्या बाजूने असलेल्या काचेवर दगडफेक केली. त्यानंतर ते अज्ञात तेथून पळून गेले. अचानक दगडफेक झाल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. या घटनेची माहिती एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आगारातील अधिकाऱ्यांना दिली.

त्यानुसार आगारप्रमुख सचेतन बोवलेकर, अमोल कामते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत माहिती घेतली. या घटनेमुळे प्रवाशांचे हाल झाले. या सर्व प्रवाशांना अन्य पर्यायी वाहनांचा आधार घेत आपली कार्यालये गाठावी लागली.

एसटी महामंडळाच्या राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सिंधुदुर्गातील एसटी कर्मचाऱ्यांनीही या संपात सहभाग घेतल्याने जिल्ह्यात एसटी वाहतूक पुर्णतः ठप्प झाली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना हा संप मागे घेण्याचे आवाहन केले. त्या आवाहनानुसार येथील आगारात वाहक, चालक व मॅकेनिक असे तीन कर्मचारी कामावर रुजू झाले.

त्यामुळे तब्बल ३४ दिवसानंतर मालवण आगारातून काल पहिली बसफेरी सुरू करण्यात आली. यात आजच्या दुसऱ्या दिवशी या बसफेरीवर दगडफेकीची घटना घडल्याने कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या घटनेची गंभीर दखल एसटी प्रशासनाने घेतली आहे. अज्ञाताविरोधात येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT