Mamata More of Shiv Sena as Dapoli Mayor konkan update sakal
कोकण

दापोली नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे

महाविकास आघाडीची बाजी; विरोधातील शिवानी खानविलकर यांचे मतही ममता मोरे यांना

सकाळ ऑनलाईन टीम

दाभोळ : दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या ममता मोरे निवडून आल्या असून, उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खालिद रखांगे हे बिनविरोध निवडून आले. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना त्यांच्या आसनावर बसवण्यासाठी खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब व रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी हजेरी लावली. ममता मोरे यांच्याविरोधात शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षादेशामुळे त्यांनी मोरे यांना मतदान केले.

शिवसेनेचे गटनेते रवींद्र क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना पक्षाचे उमेदवार ममता मोरे यांना मतदान करण्याचा पक्षादेश बजावला असल्याने शिवानी खानविलकर यांनी मोरे यांच्या पारड्यातच मत टाकले. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी आघाडीची १४ मते ‘सेफ’ राहिली. शिवसेवा विकास आघाडीच्या कृपा घाग व प्रीती शिर्के यांनी शिवानी खानविलकर यांना मत दिले. तर, भाजपच्या जया साळवी तटस्थ राहिल्या. यामुळे शिवसेनेच्या ममता मोरे या निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रत्नागिरी सविता लष्करे यांनी जाहीर केले. उपनगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे खालिद रखांगे यांचा एकच अर्ज असल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.

कारण... राजकारण..!

  • एकमेकांविरोधात असणाऱ्या सेना व राष्ट्रवादीची प्रथमच आघाडी

  • आमदार योगेश कदम यांना या निवडणुकीपासून दूर ठेवण्यात शिवसेनेस यश

  • नाराज कदम समर्थक शिवसेवा विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात

  • ‘शिवसेवा’ला दोनच जागांवर यश. शिवसेनेचा सहा व

  • राष्ट्रवादीचा आठ जागांवर विजय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Valhe News : बँकेबाहेर विसरलेली सव्वा लाखाची रोकड असलेली पिशवी दांपत्यास केली परत

Video: बापरे! प्रार्थना बेहरेच्या पायाला गंभीर दुखापत, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'तुमच्या आशिर्वादाची...'

Viral Video: हत्तीच्या बाळाची टरबूज मागण्याची क्यूट अदा, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकली नेटकऱ्यांची मने

Thane Crime: कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ, धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT