कोकण

स्टंटबाजी करता, मग मृतदेह झाडावर लटकेल... कुठे घडली अशी घटना...

महेंद्र दुसार : सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : नदी-नाल्यात पट्टीचे पोहणारे कोकणात पदोपदी सापडतात. पावसाळ्यात ओथंबून वाहणाऱ्या नद्यांमध्ये स्टंडबाजी दाखवण्यासाठी ते जणू आतूर झालेले असतात; परंतु अक्राळ रूप धारण केलेल्या पाण्यामध्ये कोणाचेही चालत नसल्याने अनेक वेळा अशा प्रकारची स्टंटबाजी अंगाशी येऊन जीव गमवावा लागतो. अशीच घटना अलिबाग तालुक्‍यातील नवघर येथे दिवीपारंगी खाडीकिनारी घडली. स्टंटबाजी दाखवताना पुराच्या पाण्यात सहा दिवसांपूर्वी वाहून गेलेले रामराज येथील अजित दिनानाथ चिखले या 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी 3 वाजता एका झाडावर आढळून आला आहे.

5 ऑगस्ट रोजी आलेल्या पुरात स्टंटबाजी दाखवताना वाहून गेल्याची अशा प्रकारची जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. अजब म्हणजे, वाहून जाताना या दोन्ही घटनांचे व्हिडीओ शूटिंगही करण्यात आले आहे; पण कोणालाही त्यांना वाचवता आलेले नाही. नवघर येथे वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध रेवदंडा पोलिस आणि स्थानिक नागरिक घेत होते.

पाणी ओसरल्यानंतर पाच दिवस शोधमोहीम राबवण्यात आली होती; परंतु जमिनीवर, बाजूच्या झाडी-झुडपात शोधताना उंचावर अडकलेल्या मृतदेहाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. याबाबत माहिती देताना अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले की, पुरात मृत्युमुखी पडलेले अजित चिखले हे पट्टीचे पोहणारे होते. दरवर्षी ते पुराच्या पाण्यातून सहीसलामत बाहेर पडत असत. बुधवारी दुपारी 3.15 वाजता याच आत्मविश्वासाने त्यांनी नवघर पुलावरून पुरात उडी मारली, हीच उडी त्यांची अखेरची ठरली. 

अशाच प्रकारची घटना म्हसळा शहराला लागून वाहणाऱ्या जानसई नदीला आलेल्या पुराच्या दरम्यान घडली होती. मित्रांसोबत स्टंटबाजी करताना बदर हलदे या 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता. 

(संपादन : उमा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia-Ukraine Conflict : इराण-अमेरिका युद्ध सुरू असताना मध्येच युक्रेन-रशियाचं काय बिनसलं?

Miraj Panchayat Samiti : मिरज पंचायत समितीच्या इमारतीवर डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा फलक; अधिकारी गैरहजर अन् पोलिसांसमोरच चिटकवली अक्षरे, नामकरणावरून गोंधळ सुरु

Numerology: लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे असतात 'या' ३ जन्मतारखा असलेले लोक; करिअरमध्ये मिळवतात मोठे यश!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात धुवांधार; प्रशासनाची उडाली तारांबळ

Mumbai Local: सीएसएमटी-गोरेगाव लोकल ४५ दिवस बंद? रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, नेमके कारण काय?

SCROLL FOR NEXT