मंडणगड : गेल्या दोन दिवसापांसून तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. तालुक्यातील पाचरळ येथे दत्ताराम गोविंद चव्हाण यांच्या घराची पडझड झाली. यामध्ये १ लाख ४९ हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे.
बाणकोट मार्गावरील मालेगाव-नायनेदरम्यान रात्री अकराच्या सुमारास भला मोठा दगड आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. जेसीबीने तो दगड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. २९ जूनला मंडणगड तालुक्यात सरासरी ८१ मिलीमीटर इतका पाऊस झाला असून, तालुक्यात एकूण ४८१ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पाणथळ खलाटी भागात शेतकरी भातलावणी करण्याच्या कामाकडे वळला असल्याचे चित्र आहे, तर उकारी भागात अजून रोपांची वाढ लावणीयोग्य झाली नाही.
नदीनाले प्रवाहित झाले असून, विहिरी तुडूंब भरल्या आहेत. अनेक मार्गावर रस्त्याच्या बाजूला गटारे नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून गेल्याने मातीचा भराव रस्त्यावर जमा झाल्याचे चित्र आहे. त्यातून वाहन चालवताना दुचाकीचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील पूरगाव येथे विहिरीचा कठडा कोसळल्याने ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, बुधवारी (ता. २९) दिवसभर पावसाचाच होता. रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूणसह लांजा, राजापुरात संततधार पाऊस पडत होता. त्यामुळे जगबुडी, वाशिष्ठी, अर्जुना, काजळी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.
जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासात सरासरी १२ मिलीमीटर पाऊस झाला. त्यात मंडणगड २५, दापोली १३, खेड ४,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.