कोकण

कोणत्याही कामात मागे नसणाऱ्या कोकणच्या लेकी-सुनांचे होतेय कौतुक

अर्चना बनगे

रत्नागिरी: नागिरी लहान वयापासून आंबेवाल्यांच्या लेकी-सुना कष्टाची कामे पाहतात, शिकतात. त्यात लाज बाळगायची नाही, हेही झिरपत जाते. आधुनिक शिक्षण घेऊनही आंबा उद्योगात (mango processing industry) काम करताना कपड्यांवर पडलेले रसाचे डाग ज्यांना त्याचे मोल कळले त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दागिन्यांसारखे मिरवता येतात. कोणत्याही कामात मागे नसणाऱ्या या लेकी-सुनांच्या संयमाचे आणि कष्टाचे वाजवी कौतुक झाले नाही तरी त्या आपले काम करतच असतात. (mango-processing-industry-women-working-kokan-story)

लग्न करून महानगरात गेलेल्या आंबेवाल्यांच्या लेकी आंबे विकतात हे तर अगदी कॉमन. पण परत जाणाऱ्या रिकाम्या ट्रकमधून काय काय परत पाठवलं जातं? माहेरी रिकाम्या बॉक्समधील उरलेला पेंढा पुन्हा वापरायला होईल, आंबे संपले की, तो पेंढा गुरं खातील. अगदीच काही नाही तर बंब पेटवायला होईल.. तीच गत नारळाच्या करवंट्या व शेंड्यांची!

असतील तितके फणस पाठवा बाबा, असं आत्मविश्वासाने सांगणाऱ्या मुलीच्या अंगात कामाचा उरक किती असेल हे गरे विकत घेणाऱ्यांना कळणार नाही. पहाटे साडेचारला उठून घरादाराचा चहा-नाष्टा, स्वयंपाक करून ही पुण्याच्या फ्लॅटमध्ये विळी मांडून फणस फोडायला बसते आणि आठ वाजेपर्यंत काप्या गऱ्यांच्या २०० ग्रॅमच्या सुबक पिशव्या भरून तयार ठेवते. कच्चे गरे चिरून उकड गऱ्याच्या भाजीसाठी विकते. उरल्यासुरल्या आंब्याचा मुरांबा, मावा करून एकही आंबा फुकट जाऊ द्यायचा नाही हे सगळं सोपं नाही. हे कष्ट आणि वेळ व्यवस्थापन एकत्र आणायला कारणीभूत होतं आंबेवाल्यांच्या घरातले बालपण.

स्वतः उच्चशिक्षित असताना, स्वतःचं ऑफिस सांभाळत इथून कोकण प्रॉडक्ट्स पार्सलने मागवा, स्कूटरवर लादून, हमाली करत घरी आणा, प्रत्येकाची चव घ्या, वैशिष्ट्ये सांगा.. लोकांची वर्दळ किंवा होम डिलिव्हरी पोचवणे.. लोकसंपर्क आलाच आहे तर अशा काही सेवा या मुली पुरवतात की जे शहरात वाढलेल्या मैत्रिणींना कठीण आहे. पण आमच्यासाठी हाताचा मळ आहे जसे नारळ खरवडणे, नारळाचे दूध काढून सोलकढी, तांदळाच्या पिठाच्या उकडीच्या भाकऱ्या आणि उकडीचे मोदक. हे सगळं करत असताना घरातील ज्येष्ठ, लहान मुलं आणि वर्क फ्रॉम होमवाला नवरा सांभाळणे हे सगळं या जमवून आणतात.

आंबेवाल्यांच्या सुना हेही असंच अजब रसायन असतं. या आंबेवाल्यांच्या लेकीसुद्धा असतील तर ठीक, पण या इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या पूर्वाश्रमीच्या शिक्षिका, काउन्सेलर, चित्रकार, विशेष मुलांच्या ट्रेनर अशा विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या असतात. माहेरी संपूर्ण नोकरीपेशाचं वातावरण असतं. कित्येकीचं बालपण महानगरात गेलेलं असतं आणि इथे १२-१४ तासांची अव्याहत ड्यूटी करत असतात.

बरोबरीच्या मैत्रिणी उन्हाळा आला म्हणून नवरा आणि पोरांबरोबर थंड हवेच्या ठिकाणी जात असतात आणि या मात्र धगधगत्या चुलीजवळ रस आटवत नाहीत तर गरे तळत उभ्या असतात. नाहीतर कडक उन्हात साठं वाळत घालत असतात.. लग्नकार्याचे दिवस असताना लोकं नटूनथटून समारंभाला जात असतात तेव्हा या धुवट कॉटनचे कपडे घालून, केसांच्या बुचड्यावर कॅप चढवून कपड्यांवर आमरसाचे डाग मिरवत असतात. मे महिन्यात माहेरी जाणे ही जनतेची कॉमन गोष्ट असताना आंबेवाल्यांच्या सुना मात्र माहेरी तर राहोच, दीड महिना घराबाहेरसुद्धा पडू शकत नाहीत. पार्लर, शॉपिंग हे तर कोसो दूर राहिलं.

तरुणपणी हेच सगळं अनुभवलेल्या, आता घराची आघाडी व नातवंडं सांभाळणाऱ्या आणि संध्याकाळी दमून घरी आलेल्या मुलगा-सुनेला चहाचा कप देणाऱ्या सासूबाईसुद्धा मुळात आंबेवाल्यांची सूनच. पण त्यांना यात मुरून आता बराच काळ झालाय. पण आत्ताच्या पिढीतील जोडप्यालाही आंब्याच्या दिवसात संध्याकाळी एकत्र फिरायला जाणे परवडत नाही. आंबेवाल्यांच्या सुना हे चालवून घेतात कारण या दिवसात सासू-सासऱ्यांबरोबर बसून दिवसभराचा आढावा, लिखाण, गप्पा व उद्याचं नियोजन यावर चर्चा करणं अतिशय गरजेचं असतं, हे त्यांना पटलेलं असतं! आणि घरांमध्ये दिसणारं आणखी एक गोड व्यक्तिमत्व, ८० वर्षांचं वय गाठलेली घरची आजी. घर जागं होण्यापूर्वी फणस फोडायला सुरवात करणारी. तीही दोन पिढ्या आधीची आंबेवाल्याची लेक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT