the medical college of ratnagiri is started in the district government hospital in ratnagiri said uday samant 
कोकण

रत्नागिरीतील वैद्यकीय कॉलेज जिल्हा रुग्णालयातच

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय कापडगाव, दांडेआडोमऐवजी जिल्हा शासकीय रुग्णालय, मनोरुग्णालय आणि महिला रुग्णालय एकत्र जोडून तिथे सुरू करण्यात येणार आहे. निकषांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया सोपी नाही. त्यासाठी सुमारे ४६० कोटीची आवश्‍यकता आहे. दापोलीत कॉलेज होण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आश्‍वासन दिलेले नाही. तशी मागणी आमदार योगेश कदम यांनी केली; परंतु शासकीय रुग्णालयाजवळच वैद्यकीय महाविद्यालय सुरु करता येत असल्यामुळे ते तेथे होऊ शकणार नाही. सलग २५ एकर जागा आवश्‍यक असते. आमदार कदम यांची आम्ही समजूत काढू. नवीन आमदाराचा आपल्या मतदारसंघात विकास कामे करवून घेण्यासाठी प्रयत्न असतो. त्यामुळे कदम यांनी मागणी केली. यासाठी याआधी निश्‍चित केलेल्या कापडगाव येथील जागेवर एक मोठा प्रकल्प आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

रत्नागिरी पालिकेच्या नळपाणी योजनेच्या कामासाठी ६५ कोटी मंजूर असून ४० टक्‍के काम पूर्ण झाले. आतापर्यंत २१ कोटी ठेकेदाराला दिले आहेत. ठेकेदाराने काम बंद ठेवल्यामुळे ९ कोटीचा बोजा पालिका स्वतःच्या फंडातून उचलणार असल्याचा गैरसमज विरोधक पसरवत आहेत. १५ व्या वित्तच्या निधीतून ८ कोटी मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात सव्वा कोटी निधी प्राप्त झाला. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन केली.

 
कातिर्की उत्सव संयमाने साजरा करा

कातिर्की उत्सव संयमाने साजरा करावा. दिवाळीत मंदिरे सुरु झाल्यामुळे गर्दी वाढली आहे. यावर  पुढील दहा दिवस कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. परजिल्ह्यातून आलेल्या कामगारांची प्राधान्याने चाचणी केली जाईल. त्यामुळे स्थानिकामध्ये कोरोनाची लागण टाळता येईल, असे सामंत यांनी सांगितले.

उदय सामंत म्हणाले..

- शहरातील तारांगणाचे काम युध्दपातळीवर सुरु 
- युएसवरुन साहित्य मागवणार; प्रस्ताव जिल्हाप्रशासनाकडे 
- तारांगणात ४० मिनिटांचा शो दाखवणार 
- पहिल्या दहा मिनिटात शहर, परिसर, कोकणातील माहिती 
- उर्वरित ३० मिनिटात तारांगण, वैज्ञानिक चलतचित्रे थ्रीडी     स्वरुपात 
- परेदशातून येणाऱ्या साहित्यावर सुरवात अवलंबून 
- पुढील वर्षात ते सुरु होणार असल्याचा विश्‍वास

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ, नेमकं काय घडलं ?

Ganesh Festival : राज्योत्सव संहितेची गरज; गणेशोत्सवाच्या स्वरूपावर शासनाची भूमिका स्पष्ट करावी

Latest Marathi News Updates : मराठवाड्यात आज कुणबी प्रमाणपत्रांच वाटप

Chandrashekhar Bawankule: बनावट कुणबींची पडताळणी! कागदपत्रांच्या आधारावर प्रमाणपत्र देऊ नयेत, बावनकुळे यांचे निर्देश

विज्ञान, शेती, माती, संस्कृती जपणारे अणुशास्त्रज्ञ शिवराम भोजे कण होते?, असा आहे 'शिवार ते शास्त्रज्ञ' प्रवास

SCROLL FOR NEXT