Minister Aditi Tatkare Comment Regarding Polluting Industry
Minister Aditi Tatkare Comment Regarding Polluting Industry  
कोकण

प्रदुषण करणाऱ्या उद्योगाविषयी आदिती तटकरे म्हणाल्या,

मुझफ्फर खान

चिपळूण ( रत्नागिरी) - महाराष्ट्रातील कोणतेही उद्योग इतर राज्यात जाऊ देणार नाही. स्थानिकांना प्रदूषण करणाऱ्या कंपन्या नको असतील तर त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, अशी ग्वाही उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. 

उद्योग - सेवा क्षेत्रात नवी उभारी घेण्यासाठी राज्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र'चे दुसरे पर्व सुरू होत आहे. कोरोनामुळे उद्योग व्यवसायाला आलेली मरगळ दूर करणे आणि रोजगार उत्पादनासाठी सरकारने 12 सामंजस्य करार केले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, कोरोनामुळे उद्योग - व्यवसायाला आलेली मरगळ आणि रोजगार - उत्पादन, करसंकलनाला उतरती कळा लागल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थचक्राला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अडचणीच्या काळातसुद्धा राज्य सरकार गुंतवणुकीवर भर देत आहे. हा संदेश जाणे गरजेचे होते. अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूरसह देशातील मोठ्या उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी केली असून, त्यासाठी 12 सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ही सुरवात आहे. कोरोनामुळे चीनमधून बाहेर पडून इतर देशांत कारखाने सुरू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना महाराष्ट्रातील एमआयडीसींमध्ये प्रथम प्राधान्य दिले जाईल. अमेरिका, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील मोठ्या उद्योगांनी अभियांत्रिकी, वाहन व वाहन घटक, माहिती तंत्रज्ञान, लॉजिस्टिक, रासायनिक, अन्न प्रकिया या क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्राला पसंती दिली आहे. 

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये केमिकल उद्योगांना स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळे काही कंपन्या गुजरातसह इतर राज्यात स्थलांतरित होत आहेत. या विषयावर तटकरे म्हणाल्या, स्थानिकांचा विरोध असेल तर आम्ही कोणतीही रासायनिक कंपनी आणणार नाही. मात्र इतर समस्या असतील तर एमआयडीसीचे अधिकारी स्थानिकांशी चर्चा करून त्यांचे समाधान करतील. 

त्यांनी तत्काळ कारखाने सुरू करा 

अतिरिक्त लोटे एमआयडीसीमध्ये कोकाकोला आणि रेल्वेचे डबे तयार करण्याचा कारखाना सुरू होणार आहे. मत्स्य प्रकिया प्रकल्पही थोड्या दिवसात सुरू होईल. प्रदूषण विरहित कारखाने येथे आणले जातील. त्याशिवाय ज्यांनी भूखंड घेतले आहेत त्यांनी तत्काळ कारखाने सुरू करून रोजगार उपलब्ध करावा. यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT