Vijaydurg Fort esakal
कोकण

विजयदुर्ग किल्ल्याच्या समुद्राकडील तटबंदीसाठी 8 कोटींचा निधी देणार; पालकमंत्र्यांची मोठी घोषणा

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती सतत प्रयत्नशील आहे.

सकाळ डिजिटल टीम

किल्ल्याचा दर्या बुरुज, हनुमंत बुरुज, गणेश बुरुज यांसह अन्य तटबंदी डागडुजीसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या अपेक्षित अंदाजपत्रकानुसार सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे.

देवगड : तालुक्यातील किल्ले विजयदुर्गच्या (Vijaydurg Fort) डागडुजीसह समुद्राकडील तटबंदीच्या दुरुस्तीसाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अंदाजपत्रकानुसार अपेक्षित असलेला सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी पुरातत्त्व खात्यास देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्‍वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी प्रजासत्ताकदिनी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्‍यांना दिले.

किल्ल्याच्या डागडुजीसाठी पुरेसा निधी मिळाल्यास शिवप्रेमींच्या दृष्टीने ही समाधानाची बाब ठरेल, असा विश्‍वास प्रेरणोत्सव समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला. तालुक्यातील ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले विजयदुर्गची डागडुजी आवश्यक आहे. समुद्राकडील तटबंदी सततच्या समुद्राच्या लाटांच्या तडाख्यामुळे कमकुवत होण्याच्या मार्गावर आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती सतत प्रयत्नशील आहे. याच पार्श्‍वभूमीवर प्रेरणोत्सव समितीच्या वतीने प्रजासत्ताकदिनी ओरोस येथे पालकमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन तेली, प्रेरणोत्सव समितीचे संस्थापक राजीव परुळेकर, प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, उपाध्यक्ष शरद डोंगरे, सचिव बाळा कदम, खजिनदार यशपाल जैतापकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या अयोध्येमधील श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनादिनी विजयदुर्गवासीयांनी किल्ले विजयदुर्गच्या दर्या बुरुजाची प्राथमिक डागडुजी केली होती. बुरुजाच्या केलेल्या भरणीचे कार्य पालकमंत्री चव्हाण यांच्या निदर्शनास आले. त्यातच समितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन विजयदुर्गाचे ऐतिहासिक आणि पर्यटनात्मक महत्त्व अधोरेखित केले. प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी विजयदुर्ग किल्ला, नैसर्गिक गोदी, शिवकालीन जहाज बांधणी, काळ्या रेतीचे महत्त्व आणि यातून होणारा पर्यटन विकास आदी विषय पालकमंत्र्यांसमोर मांडले.

किल्ल्याचा दर्या बुरुज, हनुमंत बुरुज, गणेश बुरुज यांसह अन्य तटबंदी डागडुजीसाठी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या अपेक्षित अंदाजपत्रकानुसार सुमारे ८ कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. हा निधी प्राप्त झाल्यास ऐतिहासिक वास्तू अबाधित राहण्यास मदत होईल, असे सांगण्यात आले. चर्चेदरम्यान पुरातत्व खात्यास निधी उपलब्ध करून देण्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्‍यांना आश्‍वासित केले. श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेदिवशी किल्ले विजयदुर्ग आणि गाव पाहणी करण्यास येऊ, असेही त्यांनी सांगितले.

किल्ले विजयदुर्गच्या डागडुजीबरोबरच विजयदुर्गमधील ऐतिहासिक नैसर्गिक गोदीचा (नॅचरल डॉकयार्ड) विषय चर्चिला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जहाज बांधणी व जहाज डागडुजीचा कारखाना तेथे होता. हा कारखाना पुनर्प्रस्थापित कशा रीतीने करता येईल, यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लक्ष देऊन शिवकालीन आरमार कसे होते, त्याचे चित्र त्या पध्दतीने उभे करण्याचा संकल्प मनावर घेतला आहे.

-राजीव परुळेकर, संस्थापक, प्रेरणोत्सव समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT