Minister Uday Samant Comment On Kankavali Constituency Sindhudurg Marathi News  
कोकण

उदय सामंत म्हणाले, कणकवलीबाबत 'आमचं ठरलंय' 

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - शिवसैनिक हा वाघ आहे. त्यामुळे त्या वाघांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न कुणीही करू नये, असा इशारा विरोधकांना देतानाच पर्यटनदृष्या गोव्यापेक्षा सरस काम सिंधुदुर्गात केले जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले. 

पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानतंर उदय सामंत हे जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यांची सुरूवात वैभववाडी तालुक्‍यातुन झाली. येथील शिवसेना संपर्क कार्यालयात त्यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार वैभव नाईक, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत, अरूण दुधवडकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, निलम सावंत, दिगंबर पाटील, गुलाबराव चव्हाण, पल्लवी झिमाळ, मंगेश लोके, नंदु शिंदे, दिपक पांचाळ, संभाजी रावराणे, अंबाजी हुंबे आदी उपस्थित होते. 

सर्वांना विश्‍वासात घेऊन विकास साधणार 

मंत्री श्री. सामंत म्हणाले, ""राज्यात सर्वात चांगला विकास करण्याची संधी सिंधुदुर्गात आहे. पर्यटनदृष्ट्‌या विकासाला येथे मोठा वाव आहे. त्यादृष्टीने येत्या काळात अधिक प्रयत्न केले जाणार आहेत. सिंधुदुर्गसारखा गोव्याचा विकास करा, अशी गोव्यातील जनता म्हणेल असा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. हा विकास करताना सर्वाना विश्‍वासात घेतले जाईल. जिल्ह्यातील शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा कॅबिनेटमंत्री आहे. शिवसेनेचा कार्यकर्ता हा वाघ आहे. त्यामुळे कुणीही वाघाच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करू नये. कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.'' 

संघटनेला प्राधान्य 

अरूण दुधवडकर म्हणाले, ""संघटनेला प्राधान्य देणारा पालकमंत्री जिल्हयाला मिळाला आहे. संघटनावाढीसाठी पालकमंत्री अधिक वेळ देतील.'' अतुल रावराणे म्हणाले, ""पालकमंत्री उदय सामंत हे विकासाचा धडाका सर्वश्रुत आहे. रत्नागिरीप्रमाणे सिंधुदुर्गात सुध्दा ते विकास करतील.'' 

संकल्प कणकवलीचा 

कणकवली-देवगड-वैभववाडीचा पुढचा आमदार हा शिवसेना महाविकास आघाडीचा करण्याचा संकल्प निश्‍चित करूनच आजच्या दौऱ्याला प्रारंभ केला आहे. या मतदारसंघात भगवा फडकविणारच असे मत पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केले. 

फुकट जाणार नाही आणि पश्‍चातापही नाही 

पालकमंत्री म्हणुन वैभववाडीत आल्यामुळे सर्वच कार्यकर्त्यानी मनापासुन सत्कार केला. हा सत्कार फुकट जाऊ देणार नाही आणि सत्कार केला म्हणुन कार्यकर्त्याना पश्‍चातापही होणार नाही, याची हमी पालकमंत्री सामंत यांनी कार्यकर्त्याना दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: सोशल मीडियावरील TRP ला तुमचे यश समजण्याची चूक करू नका; सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा कुणाला सल्ला?

Radhanagari Dam Water Level : गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी; राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली

Latest Marathi Update : सोनम वांगचुक यांना अमेरिकेतून पाठिंबा

PM Narendra Modi On Paper Leak : पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! पेपरफुटीच्या प्रकरणांची फास्ट ट्रॅक कोर्टात होणार सुनावणी

Ujani Dam: उजनी धरणातील आवक १२,७९७ क्युसेकवर; उपयुक्त पाणीसाठा ५४ टक्के, धरणातून ५,५७० क्युसेक विसर्ग कायम

SCROLL FOR NEXT