Misal Festival In Februvary In Vaibhavwadi Sindhudurg Marathi News
Misal Festival In Februvary In Vaibhavwadi Sindhudurg Marathi News  
कोकण

वैभववाडीत फेब्रुवारीमध्ये मिसळ महोत्सव 

सकाळवृत्तसेवा

वैभववाडी ( सिंधुदुर्ग ) - पर्यटन आणि रोजगार वृध्दी व्हावी, या हेतुने वैभववाडीत 8 व 9 फेब्रुवारीला मिसळ महोत्सव आयोजित करण्यात येणार असुन 50 हुन अधिक पध्दतीच्या मिसळची चव जिल्हावासीयांना या महोत्सवात चाखता येणार असल्याची माहीती आमदार नितेश राणे यांनी येथे दिली. 

आमदार राणे यांची येथील नगरपंचायत कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, राजेंद्र राणे, नगराध्यक्ष अक्षता जैतापकर, रोहन रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, संजय चव्हाण, भालचंद्र साठे, दिलीप रावराणे, संतोष पवार आदी उपस्थित होते. 

आमदार राणे म्हणाले, ""वैभववाडीचे पर्यटनदृष्टया महत्व वाढावे आणि स्थानिकांना रोजगार मिळावा, या दुहेरी हेतुने जिल्ह्यात प्रथमच येथे मिसळ महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव 8 व 9 फेब्रुवारी दरम्यान येथील सार्वजनिक रंगमंचनजीक भरविण्यात येणार आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापुरसह विविध शहरात खमंग, चटकदार, चविष्टपणामुळे नावलौकीक मिळविलेले अनेक मिसळ व्यावसायिक या महोत्सवात आपआपले मिसळचे स्टॉल लावणार आहेत. 50 हुन अधिक पध्दतीच्या मिसळ जिल्हावासीयांना चाखता येणार आहे. यामध्ये काही स्थानिक व्यावसायिकांना देखील संधी देण्यात येणार आहे.'' 

या महोत्सवाचे उद्‌घाटन 8 फेब्रुवारीला सायकांळी चार वाजता खासदार नारायण राणे, माजी राज्यमंत्री आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत होणार आहे. 8 फेब्रुवारीला सायंकाळी 4 पासुन 10 पर्यंत तर 9 फेब्रुवारीला सकाळी 10 पासुन सायंकाळी दहापर्यत मिसळचा आस्वाद घेता येणार आहे. 

जैवविविधता संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा 

जैवविविधतेच्या मुद्दयाबाबत आमदार राणेंना विचारले असता श्री. राणे यांनी प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रातील जैवविविधतेचे अतिशय काटेकोरपणे सर्व्हेक्षण होणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेवुन चर्चा करणार असल्याचे आमदार राणे यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update: पुण्यातील प्रचारसभास्थळी नरेंद्र मोदी दाखल

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता-दिल्ली थोड्याचवेळात येणार आमने-सामने; जाणून कोण ठरलंय आत्तापर्यंत वरचढ

SCROLL FOR NEXT