MLA Bhaskar Jadhav criticism on Lotte MIDC ratnagirri marathi news
MLA Bhaskar Jadhav criticism on Lotte MIDC ratnagirri marathi news 
कोकण

"जबाबदार अधिकाऱ्यांचे फोन बंद; योग्यवेळी आमची नाराजी व्यक्त करु"  

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : आज ता. 20 रोजी सकाळी साडेआठ वाजता घरडा कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यू पावलेल्या कामगारांना कंपनी व्यवस्थापनाकडून प्रत्येकी 50 लाख रुपये भरपाई देण्याचे मान्य केले असल्याची माहिती आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 


स्फोट झाल्याचे समजताच आमदार भास्कर जाधव यांनी घरडा कंपनीची पाहणी केली. कंपनीतील अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली व अपघाताचे नेमके कारण काय, याबाबत माहिती घेतली. त्यानंतर कंपनीच्या बाहेर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मृत पावलेल्या कुटुंबातील अन्य सदस्यांशी सविस्तर चर्चा करून आणखीन काय मदत देता येत असेल तर तीही मदत कंपनी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जखमी कामगारांनादेखील जखमांचे स्वरूप पाहून मदत देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्यावर पूर्ण औषधोपचार करण्यात येणार आहे. घरडा कंपनीच्या अधिकाऱ्यांबाबत लोकांच्या मनात संताप आहे पण आता संताप व्यक्त करण्याची ही वेळ नाही, असा सबुरीचा सल्ला त्यांनी दिला. 

दुर्घटनेचे कारण अस्पष्ट 
दुर्घटनेचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. कंपनीची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था कारणाचा शोध घेण्याचे काम करत आहे तसेच कोल्हापूरहून शोधपथक येणार असून ते नेमके कारण शोधेल. त्यानंतर नेमके कारण समजेल, असे जाधव म्हणाले. घरडा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्याविरोधात लोकप्रतिनिधी म्हणून नक्कीच आवाज उठवणार असल्याचे जाधव यांनी सांगितले. 

योग्यवेळी आमची नाराजी व्यक्त करु 
ते म्हणाले, सकाळी घटना घडूनदेखील महाराष्ट्र प्रदूषण मंडळ तसेच लोटे औद्योगिक महामंडळाचे अधिकारी, कामगार कार्यालय रत्नागिरीत आहेत. फायर आण सेफ्टीचे कार्यालय कोल्हापूरला आहे. तेथील कोणीही अधिकारी अजून येथे आलेले नाहीत. अनेक जबाबदार अधिकाऱ्यांनी आपले फोन बंद करून ठेवले आहेत. त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. योग्यवेळी आम्ही आमची नाराजी व्यक्त करू, अशा इशारा त्यांनी दिला. 

कामगारांच्या जिवाशी खेळ 
कंपनीत सातत्याने अशा घटना घडत आहेत. कामगारांच्या जिवाशी हा खेळ सुरू आहे. ही गंभीर बाब असून यावर स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून गंभीर विचार करावा लागणार आहे, असेही जाधव यांनी नमुद केले.  


संपादन- अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT