कोकण

आमदार खलिफे, कुडाळकरांकडे प्रचाराची धुरा 

सकाळवृत्तसेवा

कुडाळ - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर कोकण विभागवार प्रचाराची जबाबदारी आमदार हुस्नबानू खलिफे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांच्याकडे दिली आहे. कोणकोणत्या नेत्यांना कोण कोणत्या वेळी प्रचारासाठी आणले जावे याबाबतची पूर्ण जबाबदारी त्या विभागाच्या प्रचार समितीची राहील. 

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणनीती कशी असावी, याबाबत सखोल चर्चा आज टिळक भवन मुंबई येथे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कॉंग्रेसच्या प्रचार समितीच्या बैठकीत झाली. या समितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर यांची निवड करण्यात आली. 

यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार भाई जगताप, प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आदी उपस्थित होते. राज्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणनीती कशी असावी, याबाबत सखोल चर्चा झाली. त्यानुसार प्रत्येक विभागात एक प्रचार समिती गठित करण्यात आली.

मुंबईमध्ये प्रचारासाठी वार रूमची व्यवस्था करण्यात आली. या वार रूममध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी माजी आमदार सुभाष चव्हाण यांची निवड करण्यात आली. तर कोकण विभागाच्या प्रचार समितीच्या संयोजकपदी आमदार हुस्नबानू खलिफे यांची निवड करण्यात आली. तर या समितीत कुडाळकर यांची निवड करण्यात आली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT