mla nitesh rane meeting vaibhavwadi konkan sindhudurg 
कोकण

...म्हणून आमदार नीतेश राणे झाले संतप्त

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - जनतेच्या आरोग्यापेक्षा आम्हाला दुसरं काहीही महत्त्वाचं वाटत नाही. त्यामुळे कोणाचेही फोन आले तर तुम्ही वितळून जाऊ नका. कोणाचीही चूक अजिबात चालणार नाही. बदलापूर हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. तेथून आचिर्णेत लोक आले आहेत. त्यांची तपासणी केली का? असा संतप्त सवाल आमदार नीतेश राणे यांनी तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकारी यांना आढावा बैठकीत केला. 

आमदार राणे यांनी तहसील कार्यालयात "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर आढावा बैठक घेतली. यावेळी तहसीलदार रामदास झळके, नगराध्यक्षा अक्षता जैतापकर, सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, पंचायत समिती सदस्य अरविंद रावराणे, उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सूरज कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ नवनाथ कांबळे, पुरवठा अधिकारी संभाजी खाडे, शिवराज चव्हाण आदी उपस्थित होते. 

कोरोनामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या बदलापुरातून काही लोक आचिर्णे येथे आले आहेत. तसेच होम क्‍कारंटाईन व्यक्तीला शिवभोजन योजनेचा ठेका दिला गेला होता. अशा प्रकारांतून कोरोनाचा प्रसार झाला तर तालुक्‍याचे काय होईल? याचा विचार करा. राजकीय नेते आणि सामान्य जनता असा फरक करू नका, असे खडे बोल आमदार राणे यांनी तहसीलदार झळके यांना सुनावले. आरोग्य विभागाचा आढावा घेताना होम क्वॉरंटाईनमध्ये खूपच हलगर्जीपणा दिसून येत आहे. या संकटाला ईतकेही सहज घेऊ नका. लोकांच्या आयुष्यापेक्षा आम्हाला काहीच महत्त्वाचं वाटत नाही. त्यामुळे चुका करु नका, असा इशारा राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला. 
आमदार राणे यांनी धान्य पुरवण्याची माहिती घेतली. त्यावेळी शिधापत्रिका नसलेल्या लोकांना धान्य देण्याबाबत केंद्र सरकारने अधिसूचना काढलेली असताना त्यांना धान्य का देत नाही? त्या लोकांनी काय करायचे? अशी विचारणा केली. त्यावर वरिष्ठ कार्यालयाकडून जादा पुरवठा झालेला नाही. मात्र, अशा लोकांची माहिती संकलित करुन जिल्ह्याला पाठविण्यात आली आहे, झळके व पुरवठा अधिकारी खाडे यांनी स्पष्ट केले. 

...तर सक्षम पर्याय निर्माण करा 
आठवडा बाजाराच्या निमित्ताने आजूबाजूच्या गावातून लोक येतात. ते भाजीपाला व अन्य वस्तू घेऊन जातात. बुधवारचा आठवडा बाजार बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असाल; तर बाजारात येणाऱ्या शहराबाहेरच्या लोकांना सक्षम पर्याय निर्माण करुन द्या, अशी सूचना आमदार नीतेश राणे यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना केल्या. 

रुग्णांसाठी खासगी सहकार्य घ्या 
शासकीय आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या मोहिमेत आहे. त्यामुळे अन्य आजारांच्या रुग्णांबाबत काय नियोजन आहे. याबाबत माहिती घेत. अन्य रुग्णांना तपासणी व उपचारांसाठी खासगी 
"डॉक्‍टर्स'चे सहकार्य घ्या. जे डॉक्‍टर्स सहकार्य करण्यास तयार असतील "त्या' डॉक्‍टर्सची यादी रुग्णांच्या माहीतीसाठी जाहीर करा, अशी सूचना नीतेश राणे यांनी आरोग्य विभागाला केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : जेधे चौकातून सारसबागेकडे जाणारा भुयारी मार्ग तीन दिवस बंद; दुरुस्तीचे काम १० नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार

Maharashtra Government Rewards World Cup Winners : महाराष्ट्र सरकारकडून वर्ल्डकप विजेत्या स्मृती, जेमिमा अन् राधा यांना बक्षीस स्वरूपात मोठी रक्कम!

Latest Marathi News Live Update: सोमवार पेठेतील हॉटेलमध्ये आगीत तरुणाचा मृत्यू

Uruli Kanchan : दारू वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर उरुळी कांचन पोलिसांची धडक कारवाई; सुमारे साडे अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त!

फक्त संपत्तीतच नाही तर वयानेही विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ; दोघांच्या वयात किती आहे अंतर?

SCROLL FOR NEXT