Nilesh Rane esakal
कोकण

CBI रत्नागिरीत आल्यावर पोलीस अधीक्षकांना कोरोना कसा झाला? निलेश राणेंचा सवाल

राजेश कळंबटे

सध्या सीबीआयची टीम रत्नागिरी दौऱ्यावर असताना निलेश राणे यांनी घेतलेला पवित्रा आक्रमक आहे.

रत्नागिरी : रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग (Superintendent of Police Mohit Kumar Garg) यांच्या मनमानीविरुद्ध भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) आक्रमक झाले आहेत. रत्नागिरी दौऱ्यावर सीबीआयचं (CBI) एक पथक आहे. मात्र, ही टीम आल्यावरच एसपींना कोरोना कसा काय झाला? असा सूचक सवाल उपस्थित करत संबंधित यंत्रणेकडं एसपींच्या मनमानी कारभाराची माहिती देणार असल्याचं ट्विट राणेंनी केलंय.

रत्नागिरीचे (Ratnagiri) पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या कार्यपद्धतीबद्दल भाजपचे नेते निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोलीतील वादग्रस्त रिसॉर्टच्या केसमध्ये अधीक्षक गर्ग यांच्या भूमिकेवर राणे यांनी सवाल उपस्थित केले होते. तर, काही दिवसांपूर्वी दापोली पोलीस स्थानकाला लागलेल्या आगीबद्दल विविध संशय व्यक्त करतानाच मोहितकुमार गर्ग सातत्यानं दापोलीत का असतात, सरकारी निवासव्यवस्था नाकारून गर्ग यांचा खासगी खर्च कोण भागवतं, दापोली पोलीस स्थानकाला आग लागल्यानंतर गर्ग थोड्या वेळातच तिथं कसं काय पोहोचले, रत्नागिरीतील त्यांच्या केबिनच्या नूतनीकरणाचा खर्च कोण करतंय, असे सवाल उपस्थित करून खळबळ उडवली होती.

त्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे यांचं ट्विट रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेत आलंय. ''मागच्या काही दिवसांपूर्वी मी रत्नागिरी SP मोहित कुमार गर्ग यांच्यावर आरोप केले होते. CBI ची एक टीम रत्नागिरीमध्ये 3 दिवसांसाठी दाखल झाली. या दौऱ्याची माहिती मिळताच SP यांना कोरोना झाला. काही झालं तरी संबंधित यंत्रणेकडं मी माहिती देणार, पण SP आहात म्हणून मनमानी चालणार नाही.'', असं त्यांनी ट्विट केलंय. सध्या सीबीआयची टीम रत्नागिरी दौऱ्यावर असताना निलेश राणे यांनी घेतलेला पवित्रा आक्रमक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad North Politics: राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश; हनुमानवाडी, भवानवाडीत बाळासाहेब पाटील गटाला धक्का..

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

SCROLL FOR NEXT