monkey fever case in sindudurg district kokan martahi news 
कोकण

सावधान ! आता कोरोना पाठोपाठ आला हा वायरस...

सकाळ वृत्तसेवा

बांदा (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील डेगवे-मोयझरवाडी येथील दिनेश शांताराम देसाई (वय ४५) यांचा आज पहाटे गोवा-बांबोळी रुग्णालयात माकडतापाने मृत्यू झाला. गेले दीड महिने त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. सावंतवाडी तालुक्यातील माकडतापाचा हा दुसरा बळी आहे.

जिल्ह्यातील दुसरा बळी​

दिनेश देसाई यांना माकडताप झाल्याचे निदान झाले होते. सुरुवातीला त्यांना सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने ८ फेब्रुवारी रोजी त्यांना गोवा-बांबोळी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती उपचारांना साथ देत नव्हती. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालविली. पंधरा दिवसांपूर्वी सावंतवाडी तालुक्यातील पडवे-माजगाव येथील लक्ष्मण शिंदे यांचा देखील माकडतापाने मृत्यू झाला होता.

 आणखी दोन रुग्ण  सापडले
दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील भालावल येथे दोन रुग्ण माकडताप पॉझिटीव्ह सापडले असून त्यांच्यावर तळकट (ता. दोडामार्ग) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ऐन काजू हंगामात गेल्या पंधरा दिवसात माकडतापाने दोन बळी गेल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Duplicate Voters List : दुबार मतदाराच्या नावापुढे डबल स्टार, नगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी आयोगाने उचलले मोठे पाऊल, कशी घेणार दक्षता ?

Stock Market Closing Bell : शेअर बाजारातील सर्व निर्देशांक लाल रंगात बंद; सेसेक्स 519 अंकांनी खाली; कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : मणिपूरमधील चुराचंदपूरमध्ये सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत चार नक्षलवादी ठार

IPL 2026 : KL Rahul च्या बदल्यात दिल्ली कॅपिटल्सने KKR समोर ठेवले तीन पर्याय, कोलकाता फ्रँचायझीने दाखवला ठेंगा

ODI Rankings: स्मृती मानधनाच्या सिंहासनाला धक्का! वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला टेन्शन देणारी फलंदाज बनली नंबर वन

SCROLL FOR NEXT